Redmi Smartphone: दररोज फक्त ५६ रुपये देऊन खरेदी करता येईल Redmi चा दमदार फोन, मिळतो ५०MP कॅमेरा

नवी दिल्ली : Note 11T ३० नोव्हेंबरला भारतीय बाजारात लाँच झाला होता. इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत फोनच्या ६ जीबी + ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १४,९९९ रुपये, ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत १५,९९९ रुपये, ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १७,९९९ रुपये आहे. फोनचा सेल आजपासून (२१ डिसेंबर) सुरू होत आहे. ग्राहक या स्मार्टफोनला Amazon आणि Mi.com वरून खरेदी करू शकता. तसेच, अ‍ॅमेझॉनच्या ऑफर अंतर्गत दररोज ५६ रुपये देऊन देखील फोन खरेदी करता येईल. वाचा: स्मार्टफोनच्या खरेदीवर ICICI बँकेच्या कार्डधारकांना १ हजार रुपये सूट मिळेल. तसेच, नो-कॉस्ट ईएमआयवर देखील फोन खरेदी करता येईल. नॉन-प्राइम मेंबर्ससाठी ६ महिने आणि प्राइम मेंबर्ससाठी ९ महिन्यांची नो-कॉस्ट ईएमआयची सुविधा आहे. प्राइम मेंबरशिप असल्यास तुम्हाला महिन्याला १,६६७ रुपये द्यावे लागतील. अशाप्रकारे, दिवसाला फक्त ५६ रुपये दररोज देऊन हा फोन खरेदी करू शकता. तसेच, प्राइम मेंबरशिप नसल्यास २,५०० रुपये (दररोज ८३ रुपये) महिन्याला द्यावे लागतील. Redmi Note 11T 5G चे फीचर्स 5G स्मार्टफोनमध्ये ६.६ इंच फुल एचडी+ डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट९० हर्ट्ज आहे. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी यात रीडिंग मोड देखील आहे. या ५जी फोनमध्ये MediaTek Dimensity ८१० प्रोसेसरसह ८ जीबीपर्यंत रॅम आणि १२८ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज दिले आहे. फोनमध्ये ३ जीबीपर्यंत व्हर्च्यूअल रॅम देखील आहे. फोटोग्राफीसाठी यात ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. याचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सल आणि ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेंस आहे. सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यात ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. यामध्ये ३.५ एमएम ऑडिओ जॅक आणि USB टाइप-C पोर्टचा सपोर्ट दिला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pfrwMJ

Comments

clue frame