Realme GT 2 सीरीज: कंपनीचा सर्वात महाग स्मार्टफोन Realme GT 2 आज होणार लाँच, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: Realme आज Series लाँच करणार असून हा फोन Snapdragon 8 Gen 1 SoC सह सादर केला जाईल. तसेच, यात अल्ट्रा-वाइड-अँगल कॅमेरा आहे. तुम्ही त्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग सोशल मीडिया चॅनेल आणि यूट्यूबवर देखील पाहू शकाल. दुपारी २. ३० पासून फोनचा लाईव्ह इव्हेन्ट सुरु होणार. जाणून घेऊया Realme GT 2 मालिकेची संभाव्य वैशिष्ट्ये. वाचा : Realme GT 2 Series ची संभाव्य वैशिष्ट्ये: कथित रेंडरनुसार, या फोनमध्ये एक वेगळा रियर कॅमेरा मॉड्यूल दिला जाऊ शकतो. Device २०१५ Google Nexus 6P द्वारे मोठ्या प्रमाणात प्रेरित दिसते. त्याची मागील कॅमेरा प्रणाली ५० मेगापिक्सेल कॅमेरा आणि GR लेन्ससह येऊ शकते. याच्या फ्रंटमध्ये व्हिडिओ कॉलिंग आणि सेल्फीसाठी ३२ -मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा फोन Snapdragon 8 Gen 1 SoC सह सादर केला जाईल. मात्र हा चिपसेट कोणता असेल याबाबत माहिती उपलब्ध झालेली नाही. Realme GT 2 Pro शी संबंधित इतर माहितीबद्दल बोलायचे झाल्यास, १२० Hz रिफ्रेश रेटसह ६.८ -इंचाची स्क्रीन दिली जाऊ शकतो. त्याच वेळी, फोनमध्ये OLED पॅनल दिले जाऊ शकते. त्याच्या डिस्प्लेमध्ये WQHD + (२९६०×१४४० pixels) रिझोल्यूशन असण्याची शक्यता आहे. तसेच, यात १ TB पर्यंत स्टोरेजसह ऑफर केले जाऊ शकते. फोनमध्ये Wi-Fi 6, Bluetooth ५.२ , 5G सह इतर कनेक्टिव्हिटी पर्याय उपलब्ध करून दिले जातील. फोनमध्ये ५००० mAh बॅटरी दिली जाऊ शकते. यासोबत १२५ W फास्ट चार्जिंग सपोर्ट दिला जाईल. त्याची किंमत ५०,००० ते ६०,००० रुपयांपर्यंत असू शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Ffw5w6

Comments

clue frame