Prepjoy App: खेळता खेळता करू शकता स्पर्धा परीक्षांचा अभ्यास, हे ‘अ‍ॅप’ येईल खूपच उपयोगी

नवी दिल्ली : तासंतास अभ्यास करून स्पर्धा परीक्षांमध्ये पास होणे सोपी गोष्ट नाही. मात्र, तुम्ही अगदी सहज टेक्नोलॉजीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू शकता. Ed-टेक स्टार्टअप ने यासाठी खास नावाचे अ‍ॅप लाँच केले आहे. वाचा: या अ‍ॅपच्या मदतीने देशभरातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये पास होतील. याद्वारे गेम खेळता खेळता अभ्यास करता येईल. Prepjoy सध्या हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये उपलब्ध आहे. कंपनीने माहिती दिली की, त्यांचे लक्ष्य अभ्यासाच्या कंटेंटचे सर्वात मोठे स्टोर तयार करणे आहे. तसेच, यूजर्सला चांगला अनुभव देणे हा आहे. कंपनीचे म्हणणे आहे की शिकणे हे नेहमी आनंदी व एक्सायटिंग असणे गरजेचे आहे. यामध्ये शिकण्यासाठी यूजर्सला तीन माध्यम मिळतात. यूजर्स व्हिडिओ पाहू शकतात. वाचू शकतात व गेम खेळू शकता. अ‍ॅपमध्ये करंट अफेअर्स, जनरल अव्हेरनेस, जनरल नॉलेज, जनरल स्टडीज, इंडियन अँड ग्लोबल एनवायरमेंट, नॅशनल आणि इंटरनॅशन अपडेट्स आणि इतर विषयांची माहिती उपलब्ध होईल. कंपनीने माहिती दिली की, Prepjoy च्या माध्यमातून यूजर्सला आपले ज्ञान वाढण्यास व करिअरमध्ये यशस्वी होण्यास मदत होईल. यातील डेली चॅलेंजद्वारे यूजर्स प्रोग्रेसला ट्रॅक करू शकतात. याद्वारे यूजर्स बँकिंग, एसएससी, रेल्वे, सिव्हिस सर्व्हिस, MBA IBPS PO, IBPS Clerk, , , आणि इतर सरकारी परीक्षांची तयारी करू शकतात.परीक्षांना लक्षात घेऊन तज्ञांनी हा प्लॅटफॉर्म तयार केला आहे. यूजर्स डेली अफेअर्स पाहताना कंटेट देखील पाहू शकतील व महत्त्वाचे लेख सेव्ह करता येईल. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mpBXvp

Comments

clue frame