Prepaid Plans: रिलायन्स जिओचे स्वस्तात मस्त प्लान्स, १० जीबी अतिरिक्त डेटासह मिळेल डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन
नवी दिल्ली : आपल्या यूजर्सला एकापेक्षा एक शानदार रिचार्ज प्लान ऑफर करत आहे. कंपनीकडे असे काही प्लान्स आहेत, ज्यात १० जीबीपर्यंत अतिरिक्त डेटा मिळतो. ३६५ दिवसांच्या वैधतेसह येणाऱ्या प्लान्समध्ये डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. या प्लान्समध्ये मिळणाऱ्या फायद्यांविषयी जाणून घेऊया. वाचा: जिओचा ६०१ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये यूजर्सला दररोज ३ जीबी डेटासह ६ जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. प्लानची वैधता २८ दिवस आहे. म्हणजेच एकूण ९० जीबी डेटा मिळतो. याशिवाय दररोज १०० मोफत एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग, डिज्नी+ हॉटस्टार आणि अॅप्सचे सबस्क्रिप्शन मिळते. जिओचा १,०६६ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानमध्ये ८४ दिवसांसाठी दररोज २ जीबी डेटासह ५ जीबी अतिरिक्त डेटा मिळतो. प्लानमध्ये एकूण १७३ जीबी डेटा दिला जात आहे. यात दररोज १०० मोफत एसएमएस, अनलिमिटेड कॉलिंग आणि जिओ अॅप्ससह डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. जिओचा ३,११९ रुपयांचा प्लान जिओच्या या प्लानची वैधता ३६५ दिवस आहे. यामध्ये दररोज २ जीबी डेटासह अतिरिक्त १० जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएस आणि डिज्नी+ हॉटस्टारचे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात आहे. तसेच, जिओ अॅप्सचा देखील अॅक्सेस मिळतो. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/34coOjd
Comments
Post a Comment