Poco Smartphone: Poco च्या ‘या’ फोन्सला भारतीयांचा प्रचंड प्रतिसाद, ३० लाख हँडसेट्सची विक्री, किंमत १० हजारांपेक्षा कमी
नवी दिल्ली : हँडसेट निर्माता कंपनी च्या ला भारतीय बाजारात जबरदस्त प्रतिसाद मिळत असल्याचे पाहायला मिळतेय. कंपनीने या सीरिज अंतर्गत कमी किंमतीत दमदार फीचर्ससह येणारे स्मार्टफोन लाँच केले आहेत. वाचा: कंपनीने माहिती दिली की, Poco C Series च्या लाँचिंगनंतर आतापर्यंत फ्लिपकार्टच्या माध्यमातून ३० लाख यूनिट्सची विक्री झाली आहे. सी सीरिज १० हजार रुपयांच्या प्राइस सेगमेंटमध्ये येते. या सीरिजमधील आणि ला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. POCO C31 चे स्पेसिफिकेशन्स POCO C31 मध्ये ६.५३ इंच HD+ डिस्प्ले दिला असून, याचा आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. फोन TUV Rheinland सर्टिफिकेशनसह येतो. यात स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी MediaTek Helio G35 SoC सह ४ जीबीपर्यंत रॅम आणि ६४ जीबीपर्यंत स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी कार्डद्वारे ५१२ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, यात १३ मेगापिक्सल प्रायमरी, प्रत्येकी दोन २ मेगापिक्सलचे कॅमेरे आहेत. सेल्फीसाठी यात ५ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात ५००० एमएएचची दमदार बॅटरी, फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस अनलॉक सपोर्ट दिला आहे. Poco C31 ची किंमत फोनच्या ३ जीबी + ३२ जीबी व्हेरिएंटची किंमत ८,४९९ रुपये, ४ जीबी + ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,४९९ रुपये आहे. POCO C3 चे स्पेसिफिकेशन्स फोनमध्ये ६.५३ इंच प्लस डिस्प्ले, ऑक्टा-कोर मीडियाटेक हीलियो जी३५ चिपसेटसह ४ जीबीपर्यंत रॅम, रियरला १३ + २ +२ मेगापिक्सल आणि फ्रंटला ५ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी १० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. Poco C3 ची किंमत या स्मार्टफोनच्या ३ जीबी + ३२ जीबी व्हेरिएंटची किंमत ८,४९९ रुपये आणि ४ जीबी + ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,४९९ रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31Xh43W
Comments
Post a Comment