OnePlus: OnePlus 10 Pro मध्ये मिळतील 'हे' दमदार फीचर्स, ८० W फास्ट चार्जिंगचा सपोर्टही मिळणार, पाहा डिटेल्स
नवी दिल्ली: हँडसेट मेकर कंपनी बहुचचर्चित OnePlus 10 सीरीज पुढील वर्षी २०२२ च्या सुरुवातीला लाँच करू शकते. या सीरीज अंतर्गत OnePlus 10 आणि स्मार्टफोन युजर्सच्या भेटीला येऊ शकतो. आगामी स्मार्टफोन्सशी संबंधित काही माहिती समोर आली असून आता OnePlus 10 Pro चे स्पेसिफिकेशन्स डिजिटल चॅट स्टेशनच्या अहवालातून लीक झाले आहेत. टिपस्टरने Weibo पोस्टद्वारे फोनचे कथित तपशील शेअर केले आहेत. OnePlus 10 Pro च्या लीक झालेल्या फीचर्सबद्दल जाणून घ्या सविस्तर. वाचा: OnePlus 10 Pro (लीक): हा OnePlus मोबाईल फोन १२० Hz रिफ्रेश रेटसह ६.७ इंच १४४ 0p LTPO Amoled डिस्प्लेसह लाँच केला जाऊ शकतो. आगामी OnePlus स्मार्टफोन ८० W वायर्ड आणि ५० W वायरलेस फास्ट चार्जिंग सपोर्टसह सुसज्ज असू शकतो. स्क्रीनच्या डाव्या बाजूला एक पंच-होल कटआउट असू शकतो, ज्यामध्ये ३२ मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा बसवला जाऊ शकतो. फोनच्या मागील पॅनलवर फोटोग्राफीसाठी, ५० मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल लेन्ससह ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा टेलीफोटो लेन्स समाविष्ट केला जाऊ शकतो. टिपस्टरनुसार OnePlus 10 Pro स्मार्टफोन Android 12 वर आधारित ColorOS 12 कस्टम UI वर काम करतो. कन्फर्म: कंपनीने आधीच खुलासा केला आहे की आगामी OnePlus 10 मालिका Qualcomm Snapdragon 8 Gen 1 प्रोसेसरद्वारे समर्थित असेल. हा चिपसेट ३० टक्के जास्त पॉवर आणि २५ टक्के जास्त पॉवरचा असल्याचा दावा करण्यात आला आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mc1oQY
Comments
Post a Comment