Noise Smartwatch: १५ दिवसांच्या दमदार बॅटरी लाइफसह Noise ची नवीन स्मार्टवॉच लाँच, किंमत तुमच्या बजेटमध्ये; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : ने भारतात आपली नवीन ColorFit Caliber ला लाँच केले आहे. यामध्ये अनेक वॉच फेस, हार्ट रेट सेंसर, SpO2 मॉनिटरसह अनेक महत्त्वाचे फीचर्स दिले आहेत. तसेच, वस्तूंना ट्रॅक देखील करता येणार आहे. तुम्ही जर नवीन वॉच खरेदी करण्याचा विचार करत असाल तर एक चांगला पर्याय ठरू शकता. याच्या फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Noise ColorFit Caliber ची किंमत: Noise ColorFit Caliber ची मूळ किंमत ३,९९९ रुपये आहे. मात्र, इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत १,९९९ रुपयात खरेदी करू शकता. वॉच ब्लॅक, ग्रीन, रेड आणि व्हाइट रंगात ६ जानेवारीपासून फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल. Noise ColorFit Caliber चे फीचर्स: Noise ColorFit Caliber मध्ये आयपी६८ रेटिंग दिले आहे. वॉच वॉटर-रेसिस्टेंट आहे. यामध्ये १.६९ इंच फ्लॅट एलसीडी डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २४०x२८० पिक्सल आहे. यामध्ये १५० पेक्षा अधिक वॉट फेस मिळतात. तसेच, ६० पेक्षा जास्त गेम मोड आहेत. यात हार्ट रेट मॉनिटरची सुविधा दिली आहे. वॉचमध्ये एक सेंसर दिले आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही शरीराचे तापमान मोजू शकता. डिव्हाइस अ‍ॅक्सिस एक्सेलेरोमीटर आणि एक पॉली कार्बोनेट केसिंगसह येते. वॉचद्वारे तुम्ही स्लीपला देखील ट्रॅक करू शकता. कंपनीचा दावा आहे की, एकदा चार्ज केल्यानंतर वॉचला १५ दिवस वापरणे शक्य आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ENUojM

Comments

clue frame