Motorola Smartphones: नववर्षाच्या आधीच मोटोरोलाने ग्राहकांना दिला मोठा झटका, ३ हजार रुपयांपर्यंत वाढवली ‘या’ लोकप्रिय फोन्सची किंमत
नवी दिल्ली : मोटोरोलाने भारतीय बाजारात आपल्या आणि च्या किंमतीत वाढ केली आहे. आता हे फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना जास्त पैसे खर्च करावे लागतील. कंपनीने मोटो जी३१ ला २९ डिसेंबर आणि मोटो जी५१ ला १० डिसेंबरला लाँच केले होते. वाचा: Moto G31 ची किंमत या स्मार्टफोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला १२,९९९ रुपयात सादर केले होते. मात्र, आता याची १३,९९९ रुपयात विक्री केली जात आहे. तर ६ जीबी रॅम व्हेरिएंटला १४,९९९ रुपयात लाँच केले होते. याची १६,९९९ रुपयात विक्री होईल. सध्या ६ जीबी रॅम व्हेरिएंट उपलब्ध नाही. Moto G51 ची किंमत फोनच्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी व्हेरिएंटला १४,९९९ रुपयात लाँच केले होते. आता या मॉडेलची किंमत ३ हजार रुपयांनी वाढून १७,९९९ रुपये झाली आहे. कंपनीने किंमती वाढवण्यामागचे कारण अद्याप सांगितलेले नाही. Moto G51 5G चे स्पेसिफिकेशन्स या स्मार्टफोनमध्ये ६.८ इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. यात स्नॅपड्रॅगन ४८०+ चिपसेटचा सपोर्ट मिळतो. फोनमध्ये २० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. याशिवाय रियरला ५० मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड सेंसर आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसर मिळतो. सेल्फीसाठी यात फ्रंटला १३ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. Moto G31 चे स्पेसिफिकेशन्स या फोनमध्ये ६.४ इंच फुल-एचडी+ (१०८०x२४०० पिक्सल) ओलेड डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. यात मीडियाटेक हीलियो जी६५ प्रोसेसर मिळतो. फोनमध्ये रियरला ५० मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड सेंसर आणि २ मेगापिक्सल मॅक्रो सेंसर मिळतो. तर फ्रंटला १३ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3JrI8ct
Comments
Post a Comment