Motorola Smartphone: Motorola च्या ‘या’ हँडसेटचा धुमाकूळ, ३ मिनिटात १२० कोटींच्या फोन्सची विक्री

नवी दिल्ली : चा नवीन स्मार्टफोन ला ग्राहकांकडून शानदार प्रतिसाद मिळत असल्याचे दिसत आहे. चीनमध्ये झालेल्या पहिल्या सेलमध्ये तीन मिनिटात फोनच्या १० हजार यूनिट्सची विक्री झाली आहे. वाचा: पोस्टर शेअर करत कंपनीने माहिती दिली की, पहिल्या सेलमध्ये १०० मिलियन युआनची (जवळपास १२० कोटी) विक्री झाली. फोनला अनेक ई-कॉमर्स साइटद्वारे खरेदीसाठी उपलब्ध होता. फोनची सुरुवाती किंमत ३,१९९ युआन (जवळपास ३८,३०० रुपये) आहे. Edge X30 चे फीचर आणि स्पेसिफिकेशन मोटो Edge X30 मध्ये ६.८ इंच फुल एचडी+ डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल, आस्पेक्ट रेशियो २०:९ आणि रिफ्रेश रेट १४४ हर्ट्ज आहे. यात स्नॅपड्रॅगन ८ झेन १ प्रोसेसरसह १२ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज मिळते. यात साइंड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. तर फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात ५० मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, ५० मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेंस आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर दिला आहे. तसेच, सेल्फीसाठी ६० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी ६८ वॉट टर्बो पॉवर फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळते. फोन अँड्राइड १२ आउट ऑफ द बॉक्सवर आधारित MYUI ३.० वर काम करतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ५जी, ४जी LTE, वाय-फाय ६, ब्लूटूथ ५.२, जीपीएस/ए-जीपीएस, एनएफसी आणि यूएसबी टाइप-C पोर्ट दिला आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3F49lPD

Comments

clue frame