Motorola : मोटोरोलाच्या या फोनला भन्नाट प्रतिसाद; तब्बल १ लाख ७० हजार प्री-ऑर्डर, मिळतो १०८MP कॅमेरा

नवी दिल्ली : मोटोरोलाने ९ डिसेंबरला नवीन स्मार्टफोन आणि Edge S30 ला चीनमध्ये लाँच केले होते. काही दिवसांपूर्वीच फोनचा पहिला सेल आयोजित करण्यात आला होता. सेलमध्ये ३ मिनिटात १० हजार यूनिट्सची विक्री झाली. वाचा: आता २१ डिसेंबरपासून एड्ज एस३० चा सेल आयोजित केला जात आहे. फोन १५ डिसेंबरपासूनच प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध आहे. चीनमध्ये या मॉडेलच्या तब्बल १,७०,००० स्मार्टफोन्सला प्री-ऑर्डर करण्यात आले आहे. ची किंमत Motorola Edge S30 स्मार्टफोन चार व्हेरिएंटमध्ये येतो. फोनच्या ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १,९९९ युआन (जवळपास २३,८०० रुपये), ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २,१९९ युआन (जवळपास २६,२०० रुपये), ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २,३९९ युआन (जवळपास २८,५०० रुपये) आणि १२ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २,५९९ युआन (जवळपास ३०,९०० रुपये) आहे. Moto Edge S30 चे स्पेसिफिकेशन्स Edge S30 स्मार्टफोनमध्ये ६.८ इंच फुलएचडी+ LCD डिस्प्ले दिला असून, याचा रिफ्रेश रेट १४४ हर्ट्ज आणि टच सँपलिंग रेट ५७६ टच सँपलिंग रेट सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी यात साइड-फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. यात १२ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेजसह स्नॅपड्रॅगन ८८८ प्लस प्रोसेसर दिला आहे. हा फोन अँड्राइड ११ वर काम करतो. फोन ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह येतो. यात १०८ मेगापिक्सल मुख्य सेंसर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड लेंस आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर मिळतो. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. पॉवरसाटी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी दिली आहे. रिपोर्टनुसार, हा स्मार्टफोन २०२२ च्या पहिल्या तिमाहीत भारतात लाँच होऊ शकतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/33zHTve

Comments

clue frame