जगातला सर्वात पॉवरफुल स्मार्टफोन Moto Edge X30 भारतात येतोय, पाहा फीचर्स-किंमत

नवी दिल्लीः ला चीनमध्ये लाँच करण्यात आले होते. हा नवीन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 चिपसेट सोबत येणारा पहिल्या फोन पैकी एक होता. आता 91mobiles ला आपल्या सोर्सवरून माहिती झाले आहे की, हँडसेट जानेवारीच्या अखेरपर्यंत किंवा फेब्रुवारीच्या सुरुवातीत भारतात येणार आहे. Q1 2022 मध्ये भारतात स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 फोन सोबत अनेक फोन येऊ शकतात. यात Realme GT 2 Pro आणि Xiaomi 12 Pro आता, Moto Edge X30 या लिस्टमध्ये समावेश आहे. मोटोरोला काही आठवड्यात याच्या लाँचिंगची तारीख जाहीर करू शकते. या फोनला चीन मध्ये आधीच लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे Moto Edge X30 या फोनच्या फीचर्सची माहित उघड झाली आहे. Moto Edge X30 स्पेसिफिकेशंस Moto Edge X30 मध्ये 144Hz रिफ्रेश रेट सोबत ६.७ इंचाचा OLED FHD+ डिस्प्ले, 576Hz टच सँपलिंग रेट, 2400×1080 पिक्सल रेजोल्यूशन, १०० टक्के DCI-P3 कलर सरगम, HDR10+, पंच-होल कटआउट आणि इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळते. Moto Edge X30 मध्ये शक्तीशाली क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 8 Gen1 चिपसेट ग्राफिक्ससाठी एड्रेनो GPU सोबत येते. हे Android 12 OS वर MyUI 3.0 कस्टम स्किन सोबत चालते. तसेच 12GB रॅम आणि 256GB UFS 3.1 इंटरनल स्टोरेज सोबत पॅक आहे. इमर्सिव ऑडियो अनुभवासाठी डॉल्बी एटमॉसचे सपोर्ट मिळते. फोनमध्ये 68W फास्ट चार्जिंग सपोर्टची 5000mAh बॅटरी मिळते. कनेक्टिविटी फीचर मध्ये चार्जिंग आणि डेटा सिंकसाठी ५जी, ४ जी एलटीई, वाय फाय ६ ई, एनएफसी, ब्लूटूथ ५.२, जीपीएस आणि यूएसबी टाइप सी पोर्टचा समावेश आहे. Moto Edge X30 मध्ये मागील बाजुस ट्रिपल कॅमेरा आहे. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ५ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ मेगापिक्सलचा तिसरा सेन्सर आहे. सेल्फी आणि व्हिडिओसाठी फ्रंट मध्ये ६० मेगापिक्सलचा स्नॅपर दिला आहे. Moto Edge X30 ची किंमत चीनमध्ये Moto Edge X30 च्या 8GB/128GB व्हेरियंटची किंमत ३८ हजार रुपये, 8GB/256GB मॉडलची किंमत ४० हजार ३०० रुपये, आणि 12GB/256GB व्हर्जनची किंमत ४२ हजार ७०० रुपये आहे. स्पेशल एडिशन X30 फक्त 12GB/256GB मॉडलमध्ये येते. याची किंमत ४७ हजार ५०० रुपये आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, Edge X30 च्या बेस मॉडलची किंमत भारतात जवळपास ४५ हजार रुपये असू शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/345BjwV

Comments

clue frame