Mobile Recharge Plans: Vi ने दिला ग्राहकांना मोठा झटका, Disney+ Hotstar सबस्क्रिप्शनसह येणारे ‘हे’ स्वस्त प्लान्स केले बंद

नवी दिल्ली : ने आपल्या Disney+ Hotstar मोफत सबस्क्रिप्शनसह येणाऱ्या काही प्लान्सला बंद केले आहे. कंपनीच्या तीन प्लान्समध्ये एक वर्षासाठी Disney+ Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात होते. काही दिवसांपूर्वी आणि जिओने देखील डिज्नी+ हॉटस्टार सबस्क्रिप्शनसह येणारे काही प्लान्स बंद करण्याचा निर्णय घेतला होता. वाचाः ग्राहकांना आता डिज्नी+ हॉटस्टार सबस्क्रिप्शनचा लाभ घेण्यासाठी ९०१ रुपयांचा प्रीपेड रिचार्ज किंवा ३,०९९ रुपयांच्या रिचार्ज पैकी एक पर्याय निवडावा लागेल. वीआयने वेबसाइटवरून ६०१ रुपये, ७०१ रुपये आणि ५०१ रुपयांच्या प्लान्सला अनलिस्टेड केले आहे. या प्लान्समध्ये ग्राहकांना वर्षभरासाठी Disney+ Hotstar चा मोफत अ‍ॅक्सेस मिळत होता. आता यूजर्सला ९०१ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटासह अतिरिक्त ४८ जीबी डेटा मिळेल. सोबतच, ७० दिवस अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. कंपनीच्या ३,०९९ रुपयांच्या प्लानमध्ये दररोज १.५ जीबी हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉल आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. या दोन्ही प्लान्समध्ये यूजर्सला वर्षभरासाठी Disney+ Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळेल. सोबतच, यूजर्सला Vi Movies & TV, विकेंड डेटा रोलओव्हर, डेटा डिलाइट आणि बिंज ऑल नाइटचा फायदा मिळेल. एअरटेल आणि जिओने देखील बंद केले हे प्लान्स वीआयच्या आधी जिओने ४९९ रुपये, ६६६ रुपये, ८८८ रुपये आणि २,४९९ रुपयांचे प्लान्स बंद केले होते. तर एअरटेलने ३९८ रुपये, ४९९ रुपये आणि ५५८ रुपयांचे प्लान्स बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या सर्व प्लान्समध्ये वर्षभरासाठी Disney+ Hotstar चे मोफत सबस्क्रिप्शन दिले जात होते. वाचाः वाचाः वाचाः


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pEaFDJ

Comments

clue frame