Mini Printer: ब्लूटूथ स्पीकरपेक्षा लहान आहे ‘हा’ प्रिंटर, स्मार्टफोनशी कनेक्ट करून काहीही करू शकता प्रिंट

नवी दिल्ली : शाळेतील प्रोजेक्टपासून ते काही महत्त्वाच्या गोष्टींची नोंद ठेवायची असल्यास आपण कागदावर प्रिंट काढून जपून ठेवत असतो. तुम्हाला जर वारंवार महत्त्वाच्या कागदपत्रांची प्रिंट काढायची असल्यास तुमच्यासाठी बाजारात एक शानदार डिव्हाइस उपलब्ध आहे. वाचा: वर एक पॉकेट साइज उपलब्ध असून, याच्या मदतीने तुम्ही सहज प्रिंट काढू शकता व याची किंमत देखील कमी आहे. या प्रिंटरविषयी सविस्तर जाणून घेऊया. Mini Portable Wireless Bluetooth Pocket Thermal हा प्रिंटर वायरलेस असून, ब्लूटूथच्या मदतीने याला स्मार्टफोनशी कनेक्ट करू शकता. तुम्हाला फोनवर या प्रिंटरचे अ‍ॅप डाउनलोड करावे लागेल. कनेक्ट झाल्यानंतर अ‍ॅपच्या मदतीने प्रिंटरला अ‍ॅक्सेस करू शकता. हा प्रिंटर १००० एमएएच बॅटरीसह येतो. यामध्ये प्रिटिंग रोल देखील असून, याच्या मदतीने प्रिंट काढू शकता. १००० एमएएच लिथियम बॅटरीने सुसज्ज असलेला हा प्रिंटर एकदा चार्ज केल्यानंतर १५ तास वापरू शकता. याचे प्रिटिंग रिझॉल्यूशन २०३dpi आहे. या प्रिंटरमध्ये इंक लेस थर्मल प्रिटिंग होते. त्यामुळे यात इंक टाकण्याची देखील गरज पडत नाही. हे पेपरला गर्म करते व यामुळे पॅटर्न तयार होतात. या प्रिंटरसोबत तुम्हाला १ यूएसबी केबल, १ प्रिटिंग रोल आणि एक गाइड बुक मिळेल. या प्रिंटरला तुम्ही अ‍ॅमेझॉनवरून ३,०९९ रुपयात खरेदी करू शकता. यावर डिस्काउंटचा देखील लाभ मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/32GtjSH

Comments

clue frame