JioFiber: जिओचा भन्नाट प्लान, ३००Mbps इंटरनेट स्पीडसह मिळेल १६ ओटीटी अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन

नवी दिल्ली : तुम्ही जर घरी ब्रॉडबँड कनेक्शन घेण्याचा विचार करत असाल तर हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. कमी किंमतीत हाय स्पीड इंटरनेटसह फ्री ओटीटी प्लॅटफॉर्म्सचा फायदा देत आहे. यामुळे तुम्ही इंटरनेटसह व्हिडिओ पाहण्याचा देखील आनंद घेऊ शकता. जिओफायबरच्या या प्लानविषयी जाणून घेऊया. वाचा: JioFiber चा दमदार प्लान JioFiber च्या या दमदार प्लानची किंमत १,४९९+ जीएसटी आहे. प्लानची वैधता १ महिना असून, यात ३०० एमबीपीएस हाय-स्पीडने इंटरनेट वापरू शकता. प्लानमधील बेनिफिट्स JioFiber च्या या प्लानमध्ये मिळणाऱ्या अन्य बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यात , , Disney+ HotStar सह १६ ओटीटी प्लॅटफॉर्म्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. यामुळे तुम्हाला तुमचे आवडते व्हिडिओ, चित्रपट/सीरिज पाहण्याचा आनंद घेता येईल. हाय-स्पीड इंटरनेटमुळे तुम्ही कोणत्याही अडथळ्याशिवाय या प्लॅटफॉर्म्सचा आनंद घेऊ शकता. या कनेक्शनची आणखी एक चांगली गोष्ट म्हणजे घरात एकापेक्षा जास्त डिव्हाइस वापरत असतानाही बफरिंगचा सामना करावा लागणार नाही. कंपनी प्लानसोबत एक महिन्याचे ट्रायल देखील देत आहे. यामुळे तुम्ही कोणतेही पैसे न देता एक महिना इंटरनेट वापरू शकता. जिओफायबरचा हा प्लान लोकप्रिय ठरत आहे. तुम्ही जर वर्क फ्रोम होम करत असाल अथवा ऑनलाइन क्लासेस सुरू असल्यास हा प्लान नक्कीच फायद्याचा ठरेल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3E7B54y

Comments

clue frame