नवी दिल्ली: युजर्सना जास्तीत जास्त लाभ देण्यासाठी Jio कंपनी सतत प्रयत्नशील असते आणि नवीन ऑफर देखील जोडत असते . जर तुम्हाला Jio प्रीपेड वरून पोस्टपेडवर स्विच करायचे असेल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. कारण, कंपनी येथे जोरदार ऑफर देखील देत आहे. तुम्हाला प्रीपेड बजेटमधील सर्वोत्तम पोस्टपेड ऑफरचा लाभ घ्यायचा असेल, तर आज आम्ही तुम्हाला Plus च्या स्वस्त प्लान ऑफरबद्दल सांगणार आहोत जी तुमच्या बजेटमध्ये सहज बसेल. वाचा: कोणता आहे हा प्लान: या सर्वात स्वस्त प्लान बद्दल सांगायचे तर तो ३९९ रुपयांचा आहे. ज्यामध्ये तुम्हाला अनेक फायदे दिले जातात. Jio Postpaid Plus चा हा सर्वात स्वस्त प्लान आहे जो तुम्ही परवडणाऱ्या किमतीत खरेदी करू शकता. यामध्ये तुम्हाला पोस्टपेडचा फायदा तर मिळतोच, त्याचबरोबर तुम्हाला महागड्या प्लानचे फायदेही दिले जातात. काय आहेत फायदे: या प्लानच्या फायद्यांबद्दल बोलायचे झाले तर, आधी तुम्हाला यात ७५ GB डेटा मिळतो, त्यासोबत तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि प्रतिदिन १०० मेसेजेसचाही लाभ मिळतो. OTT फायदे: OTT प्लॅटफॉर्म भारतातील स्मार्टफोन युजर्समध्ये खूप लोकप्रिय झाले आहेत. बहुतेक युजर्स नेहमी त्यांच्यासोबत दोन ते तीन OTT प्लॅटफॉर्मचे सदस्यत्व घेतातच. अशा परिस्थितीत, जर तुम्ही अनेक OTT सबस्क्रिप्शन खरेदी करण्यासाठी पैसे खर्च करत असाल, तर आता तसे करण्याची गरज नाही कारण Jio Postpaid Plus मध्ये तुम्हाला आधीच Netflix आणि Amazon Prime सह अनेक प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन ऑफर केले जात आहे. याद्वारे तुम्ही दरमहा ५०० ते १००० रुपयांपर्यंत बचत करू शकता. या प्लानची वैधता एक महिन्याची आहे. वाचा: वाचा: वाचा
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3yRItzX
Comments
Post a Comment