नवी दिल्लीः मोबाइल रिचार्ज करण्याची तारीख जवळ आल्याने अनेक वेळा वारंवार रिचार्ज करावे लागते. ज्या लोकांना वारंवार रिचार्ज करण्याचा कंटाळा येत असेल त्या लोकांसाठी जिओचा वर्षभराचा प्लान मस्त आहे. जिओच्या या प्लानला रिचार्ज केल्यास वर्षभराची वैधता मिळते. या प्लानमध्ये तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग सोबत डेटाची मजा मिळते. तसेच कंपनीकडून दुसरे बेनिफिट्स सुद्धा मिळते. यात तुम्हाला जिओ टीव्ही, म्यूझिक आदी मिळते. याशिवाय, जिओच्या या प्लानमध्ये आणखी काय काय मिळतेय, जाणून घ्या. जिओचा २८७९ रुपयाचा रिचार्ज प्लान जिओच्या या रिचार्ज प्लानची किंमत २८७९ रुपये आहे. यात तुम्हाला ३६५ दिवसाची वैधता मिळते. प्लानमध्ये तुम्हाला इंटरनेट वापरासाठी रोज २ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. सध्या यावर ऑफर सुरू आहे. या प्लानला रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला २० टक्के ऑफ मध्ये २०० रुपयांपर्यंत कॅशबॅक जिओमार्टमधून मिळतो. वर्षभराच्या जिओच्या प्लानच्या शोधात असाल तर हा प्लान तुमच्यासाठी बेस्ट आहे. जिओचा ४१९९ रुपयाचा रिचार्ज प्लान जिओच्या या रिचार्ज प्लानमध्ये तुम्हाला एकूण ३६५ दिवसाची वैधता मिळते. यात तुम्हाला इंटरनेट वापरासाठी रोज ३ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. सध्या यावर ऑफर सुरू आहे. या प्लानला रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला २० टक्के ऑफ मध्ये २०० रुपयांपर्यंत कॅशबॅक जिओमार्टमधून मिळतो. वर्षभराच्या जिओच्या प्लानच्या शोधात असाल तर हा प्लान तुमच्यासाठी बेस्ट आहे. वाचाः वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3z28tJ8
Comments
Post a Comment