Jio चा सुपरहिट प्लान; सर्वात जास्त डेटा, कॉलिंग आणि Disney+ Hotstar चे फ्री सब्सक्रिप्शन

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ () ने नुकतेच आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे. जिओकडे रिचार्ज प्लान्सची मोठी यादी आहे. जर मोबाइल वर जास्त वेळ घालवत असाल, जसे तुम्हाला व्हिडिओ किंवा चित्रपट पाहण्याचा छंद असेल तर तुमच्यासाठी जिओकडे एक जबरदस्त प्लान आहे. जिओच्या या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा मिळतो. सोबत प्लानमध्ये चित्रपट आणि वेब सीरीज पाहण्यासाठी ४९९ रुपयांच्या किंमतीचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. जाणून घ्या जिओचा हा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान संबंधी. ९० जीबी डेटा, कॉलिंग आणि Disney+ Hotstar फ्री रिलायन्स जिओकडे एक ६०१ रुपयाचा जबरदस्त रिचार्ज प्लान आहे. जिओच्या या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा दिला जातो. याशिवाय, रिचार्ज प्लानमध्ये ६ जीबी एक्स्ट्रा डेटा दिला जातो. प्लानमध्ये एकूण ९० जीबी डेटा दिला जातो. या प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. यात एकूण २८०० एसएमएस पाठवू शकता. जिओच्या या प्लानमध्ये १ वर्षासाठी फ्री मध्ये Disney+ Hotstar मोबाइलचे सब्सक्रिप्शन मिळते. Disney+ Hotstar मोबाइलच्या सब्सक्रिप्शनची किंमत ४९९ रुपये आहे. परंतु, यूजर्संना या प्लानमध्ये फ्री सब्सक्रिप्शन मिळते. ४१९ रुपयाच्या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा रिलायन्स जिओच्या ४१९ रुपयाच्या प्लानमध्ये रोज ३ जीबी डेटा दिला जातो. या प्लानमध्ये एकूण ८४ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. सोबत जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन मिळते. जिओच्या या प्लानमध्ये यूजर्संना Disney+ Hotstar मोबाइलचे सब्सक्रिप्शन मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3JefOtM

Comments

clue frame