नवी दिल्ली: हँडसेट मेकर कंपनी iQOO ने आपले दोन नवीन स्मार्टफोन आणि लाँच केले असून हे दोन्ही स्मार्टफोन ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअपसह लाँच करण्यात आले आहेत. या हँडसेटच्या किंमतीपासून ते वैशिष्ट्यांपर्यंत ही सविस्तर माहिती. वाचा: iQOO Neo 5S या स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ SoC आहे स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी १२ GB पर्यंत RAM, ६६ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० mAh ची शक्तिशाली बॅटरी देण्यात आली आहे. तसेच, फोनमध्ये १२० Hz रिफ्रेश रेटसह ६.६२ -इंच फुल-HD+ AMOLED डिस्प्ले आहे, जो HDR10+ प्रमाणित आहे. फोन Android ११ वर बॉक्सच्या बाहेर काम करतो. फोनच्या मागील पॅनलवर ४८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा, १३ मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. iQOO Neo 5 SE: या iQOO मोबाइलमध्ये १४४ Hz रिफ्रेश रेटसह ६.६७ -इंचाचा फुल-एचडी+ IPS LCD डिस्प्ले आहे. स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर वापरण्यात आला आहे. तुम्हाला यात ५५ W फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० mAh ची मजबूत बॅटरी मिळेल. कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचे झाले तर फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस तीन रियर कॅमेरे दिले गेले आहेत, ५० मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरासह ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड कॅमेरा आणि २ मेगापिक्सेल मॅक्रो कॅमेरा सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फीसाठी कंपनीने फोनच्या फ्रंटमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा सेंसर दिला आहे. iQOO Neo 5S किंमत: या iQoo मोबाईल फोनच्या ८ GB रॅम आणि १२८ GB व्हेरिएंटची किंमत CNY २६९९ (अंदाजे रु ३२,१०० रुपये ) आहे. तर, ८ GB रॅम सह २५६ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत CNY २८९९ (अंदाजे रु ३४,५००) आहे. त्याच वेळी, १२ GB रॅम आणि २५६ GB सह फोनच्या टॉप मॉडेलची किंमत CNY ३१९९(अंदाजे ३८,००० रुपये) आहे. iQOO Neo 5 SE किंमत: हा iQOO स्मार्टफोन iQOO Neo 5S सारख्याच स्टोरेज प्रकारांसह लाँच करण्यात आला आहे आणि या प्रकारांच्या किंमती अनुक्रमे CNY २१९९ (अंदाजे रु. २६,१०० रुपये ), CNY २३९९ (अंदाजे २८,५०० रुपये ) आणि CNY २५९९ आहेत. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ecuefM
Comments
Post a Comment