iPhone: आता फोनवर बोलण्यासाठी Sim Card ची आवश्यकता नाही, Apple च्या नव्या आयफोनमध्ये असेल 'हे' भन्नाट फीचर

नवी दिल्ली: सिमकार्ड नसतानाही आपण एखाद्याला कॉल करू शकतो. असा विचार कदाचित तुम्ही केला नसेल. पण, Apple काहीतरी नवीन आणणार असून ज्यामुळे तुम्ही सिमकार्डशिवायही फोनवर बोलू शकाल. Apple एक iPhone घेऊन येत आहे, ज्यामध्ये सिम कार्ड घालण्यासाठी कोणताही Physical Slot नसेल. हे आयफोनच्या ई-सिमवर चालेल. Apple कंपनी iPhone 15 सीरीजमध्ये हे फीचर अपग्रेड करू शकते. मात्र, या लेटेस्ट फीचर स्मार्टफोनसाठी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागणार आहे. माहितीनुसार, कंपनी आपली iPhone 15 सीरीज २०२३ मध्ये लाँच करू शकते. iPhone 15 हा सिम कार्ड स्लॉटशिवाय येणारा पहिला फोन असू शकतो. वाचा: नवीन फोनमध्ये दोन : Apple Inc ने त्यांचे iPhone XR, iPhone XS आणि iPhone XS Max e-SIM सह लाँच केले. पण, आता चर्चा अशी आहे की, कंपनी लवकरच आयफोनमधील फिजिकल सिम कार्ड स्लॉटपासून सुटका मिळविण्याचा प्लान बनवत आहे. या संदर्भात, ब्राझीलच्या एका प्रकाशन ब्लॉगमध्ये असे लिहिले आहे की, २०२३ मध्ये येणार्‍या Apple iPhone च्या प्रो मॉडेलमध्ये म्हणजेच iPhone 15 Pro मध्ये फिजिकल सिम कार्ड स्लॉट नसेल. आयफोन कनेक्टिव्हिटीसाठी हे पूर्णपणे ई-सिम तंत्रज्ञानावर आधारित असेल. अॅपल अनेक दिवसांपासून यावर काम करत असल्याचेही रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आले आहे. हा नवा फोन दोन ई-सिमसह येईल असे ब्लॉगमध्ये सांगितले आहे. म्हणजेच यामध्ये दोन ई-सिम वापरण्यात येणार आहेत. रिपोर्टमध्ये असेही सांगण्यात आले आहे की, अॅपलने ई-सिम तंत्रज्ञानाचा वापर करून आयफोनची पुढील सीरीज आणली तर ती सीरीज जगातील इतर देशांमध्ये विकली जाणार नाही. कारण सध्या अनेक देशांमध्ये ई-सिम तंत्रज्ञान वापरणे सोपे नाही. ई-सिम म्हणजे काय? ई-सिम हे मोबाईल फोनमध्ये स्थापित केलेले व्हर्च्युअल सिम असते. जे अगदी प्रत्यक्ष सिम कार्डसारखे दिसते आणि अगदी त्याच प्रकारे काम करते. तुम्ही ई-सिमसाठी अर्ज केल्यास, तुम्हाला तुमच्या फोनमध्ये कोणतेही बाह्य सिम कार्ड घालण्याची आवश्यकता नाही. सध्या भारतात रिलायन्स जिओ, व्होडाफोन-आयडिया आणि एअरटेल त्यांच्या वापरकर्त्यांना ई-सिम फीचरची सुविधा देत आहेत. ई-सिमचे फायदे काय आहेत? ई-सिमची सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ऑपरेटर बदलल्यास, तुम्हाला सिम कार्ड बदलण्याची गरज नाही. फोन जास्त गरम झाला किंवा पाण्यात भिजला तर सिम कार्ड खराब होण्याची शक्यता असते, परंतु ई-सिमच्या विपरीत, त्याचा कोणत्याही प्रकारचा परिणाम होत नाही. हे व्हर्च्युअल सिम आहे, त्यामुळे खराब होण्याची शक्यता देखील फार कमी आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qxCywg

Comments

clue frame