Infinix: इनफिनिक्स लवकरच भारतात लाँच करणार ५जी स्मार्टफोन, किंमत असेल खूपच कमी

नवी दिल्ली : स्वस्त स्मार्टफोन बनवणारी कंपनी भारतात आपला पहिला लाँच करण्याच्या तयारीत आहे. रिपोर्टनुसार, कंपनी जानेवारीमध्ये या फोनला लाँच करू शकते. या ५जी फोनची किंमत २० हजार रुपयांपेक्षा कमी असेल. सध्या कंपनीकडे ४जी स्मार्टफोन्स असून, कंपनी याचा विस्तार करत आहे. वाचा: इंडियाचे सीईओ अनीश कपूर यांनी माहिती दिली की, कंपनी जानेवारी २०२२ अखेरपर्यंत आपला पहिला ५जी स्मार्टफोन लाँच करेल. सध्या ५जी डिव्हाइसची किंमत ४जी फोन्सच्या तुलनेत अधिक असेल. मात्र, ५जी सेवा सुरु झाल्यानंतर हँडसेट स्वस्तात उपलब्ध होतील. मात्र, काही असे यूजर्स आहेत जे ५जी सर्व्हिस सुरू होण्याआधी ५जी डिव्हाइस खरेदी करत आहेत. अनेक कंपन्या भारतात ५जी स्मार्टफोन्स लाँच करत आहे. कंपन्या ५जी स्मार्टफोन्स सादर करण्यासाठी डिव्हाइसमधील इतर फीचर्स कमी करत आहे. ४जी आणि ५जी स्मार्टफोन्सची सध्या तुलना केल्यास ४जी फोनमध्ये जास्त फीचर्स मिळतात. सेमिकंडक्टर चिप्स आणि जागतिक बाजारातील कॉम्पोनेंट्सच्या किंमतीत वाढ झाल्याने स्मार्टफोन मार्केटवर देखील परिणाम झाला आहे. इनफिनिक्स २०२१ अखेरपर्यंत भारतीय बाजारात ५५ इंट स्मार्ट टीव्ही लाँच करणार होती. मात्र, आता २०२२ च्या पहिल्या सहामाहीत टीव्हीला सादर केले जाईल. अनीश कपूर यांनी सांगितले की, कंपनीने गेल्यावर्षी एक स्मार्ट टीव्ही सादर केला होता, ज्याला ग्राहकांची मोठी पसंती मिळाली. त्यांनी माहिती दिली की, पहिल्या तिमाहीच्या अखेरीस अथवा दुसऱ्या तिमाहीच्या सुरुवातीला कंपनी ५५ इंच प्रीमियम टीव्ही लाँच करेल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GYa9X0

Comments

clue frame