Infinix Smartphone: Infinix Note 11 चा पहिला सेल आज, १२ हजारांचा फोन दरमहिना फक्त ४१६ रुपये देऊन खरेदी करण्याची संधी

नवी दिल्ली : काही दिवसांपूर्वीच लाँच झालेल्या स्मार्टफोनचा आज पहिला सेल आयोजित करण्यात आला आहे. या फोनला ई-कॉमर्स वेबसाइट वरून खरेदी करू शकता. फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी आणि ५० मेगापिक्सल कॅमेरा मिळतो. वाचा: तुम्ही जर स्वस्त स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Note 11 एक चांगला पर्याय ठरू शकतो. फोनच्या किंमत, ऑफर्स आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. Infinix Note 11 ची किंमत आणि ऑफर्स या फोनला ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज या एका व्हेरिएंटमध्येच लाँच केले आहे. फोनची किंमत ११,९९९ रुपये आहे. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. तसेच, दरमहिना फक्त ४१६ रुपये देऊन फोन खरेदी करू शकता. Infinix Note 11 चे फीचर्स: हा फोन अँड्राइड ११ आधारित XOS १० वर काम करतो. यामध्ये ६.७ इंच फुल-एचडी+ एमोलेड डिसप्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन २०८०x२४०० पिक्सल आहे. हा फोन मीडियाटेक हीलियो जी८८ प्रोसेसरसह ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह येतो. फोनमध्ये रियरला ५० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरादिला आहे. यात २ मेगापिक्सल डेप्थ लेंस आणि एआय लेंस मिळते. यामद्ये फ्रंटला सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यात सुरक्षेसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. पॉवरसाठी ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची बॅटरी मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3qiuaAD

Comments

clue frame