Gionee Smartphone: १० हजारांच्या बजेटमध्ये लाँच झाला ‘हा’ शानदार स्मार्टफोन, मिळते ५०००mAh बॅटरी

नवी दिल्ली : चीनी निर्माता ने आपला नवीन एंट्री लेव्हल हँडसेट ला लाँच केले आहे. या फोनमध्ये ६.५३ इंच आयपीएस एलसीडी डिस्प्ले, हीलियो पी६० प्रोसेसर, ६ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज मिळते. दमदार फीचर्ससह येणाऱ्या या फोनविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Gionee Ti13 ची किंमत कंपनीने या फोनला सध्या चीनमध्ये लाँच केले आहे. फोनच्या ६ जीबी + १२८ जीबी व्हेरिएंटची किंमत ८९९ CNY (जवळपास १०,५०० रुपये) आहे. तर ६ जीबी + २५६ जीबी व्हेरिएंटची किंमत १,०९९ CNY (जवळपास १२,८०० रुपये) आहे. फोनला चीनमध्ये Jd.com वरून खरेदी करता येईल. इतर देशांमध्ये फोन कधी लाँच होईल याची माहिती कंपनीने अद्याप दिलेली नाही. Gionee Ti13 चे फीचर्स Gionee Ti13 स्मार्टफोनमध्ये ६.५३ इंच आयपीएस एलसीडी डिस्प्ले दिला असून, यात एचडी प्लस ७२०पी रिझॉल्यूशन, ६० हर्ट्ज रिफ्रेश रेट १९:९ आस्पेक्ट रेशियो, ९० टक्के स्क्रीन टू बॉडी रेशियो आणि सेंटरला सेल्फी कॅमेऱ्यासह वॉटर ड्रॉप शेप्ड नॉच दिला आहे. यात मीडियाटेक ऑक्टा-कोर हीलियो P६० प्रोसेसर मिळतो. स्मार्टफोनमध्ये ६ जीबी रॅम आणि २५६ जीबीपर्यंत स्टोरेज मिळते. स्टोरेज वाढवण्यासाठी मायक्रोएसडी कार्ड सपोर्ट दिला आहे. यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह १६ मेगापिक्सल मुख्य कॅमेरा, ५ मेगापिक्सल सेकेंडरी सेंसर आणि २ मेगापिक्सल लेंस मिळते. फ्रंटला ८ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. यात साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर मिळते. तर कनेक्टिव्हिटीसाठी ड्यूल-सिम कार्ड सपोर्ट, ४जी एलटीई, वाय-फाय, ब्लूटूथ जीपीएस, ३.५ एमएम ऑडिओ जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट मिळते. डिव्हाइसची जाडी ९.३ एमएम आणि वजन २०१ ग्रॅम आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3mNkZHr

Comments

clue frame