नवी दिल्लीः रिलायन्स जिओ (), एअरटेल आणि वोडाफोन आयडिया कंपनीने नुकतेच आपल्या रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ केली आहे. महागड्या रिचार्ज प्लान्स दरम्यान जर तुम्हाला स्वस्त प्लान हवा असेल तर आज आम्ही तुम्हाला दररोज १ जीबी डेटा देणाऱ्या सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान संबंधी माहिती देत आहोत. रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वोडाफोन आयडियाच्या प्रत्येक १ जीबी डेटा देणाऱ्या रिचार्ज प्लान्सचा यात समावेश आहे. डेली खर्चाच्या आधारावर कोणता प्लान स्वस्त आहे, जाणून घ्या. डेली १जीबी डेटाच्या सर्वात स्वस्त प्लानमध्ये जिओने मारली बाजी रोज १ जीबी डेटा देणारा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान रिलायन्स जिओचा आहे. हा जिओचा १४९ रुपयाचा प्लान आहे. जिओच्या या प्लानमधील एका दिवसाचा खर्च ७.४५ रुपये आहे. जिओच्या या १४९ रुपयाच्या प्लानमध्ये २० दिवसाची वैधता मिळते. प्लानमध्ये २० जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. सोबत जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन फ्री मिळते. एअरटेलचा रोज १ जीबी डेटा देणारा प्लान रोज १ जीबी डेटा देणारा एअरटेलचा सर्वात स्वस्त प्लान २६५ रुपयाचा आहे. एक दिवसाचा खर्च या हिशोबाप्रमाणे या प्लानमध्ये डेलीचा खर्च ९.४६ रुपये आहे. एअरटेलच्या या प्लानमध्ये २८ दिवसाची वैधता मिळते. प्लानमध्ये एकूण २८ जीबी डेटा दिला जातो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये डेली १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. वोडाफोन आयडियाचा रोज १ जीबी डेटा देणारा प्लान डेली १ जीबी डेटा देणारा वोडाफोन आयडियाचा सर्वात स्वस्त प्लान २६९ रुपयाचा आहे. या प्लानमध्ये रोजचा खर्च ९.६० रुपये आहे. या प्लानची वैधता २८ दिवसाची आहे. प्लानमध्ये एकूण २८ जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये कोणत्याही नेटवर्कवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो. प्लानमध्ये रोज १०० एसएमएस पाठवण्याची सुविधा मिळते. सोबत Vi Movies आणि TV चे बेसिक अॅक्सेस मिळते. वाचाः वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Hr2L6L
Comments
Post a Comment