Budget Smartphone: ४६०० mAh बॅटरीसह HTC Wildfire E2 Plus लाँच, किंमत बजेटमध्येच, पाहा फीचर्स

नवी दिल्ली: बजेट स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. लाँच करण्यात आला असून हा एक बजेट फ्रेंडली स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये Unisoc Tiger T610 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच, यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजसह क्वाड रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध करून देण्यात आला आहे. फोनमध्ये ४६००mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जाणून घेऊया HTC Wildfire E2 Plus ची किंमत आणि फीचर्स. वाचा: HTC Wildfire E2 Plus: किंमत HTC Wildfire E2 Plus ची किंमत RUB १२,९९० म्हणजेच सुमारे १३,४०० रुपये आहे. ही त्याच्या ४ GB रॅम आणि ६४ GB स्टोरेज वेरिएंटची किंमत आहे. फोन एकाच रंगात खरेदी करता येईल. तो भारतात ते कधी लाँच होणार याबाबतची माहिती सध्या उपलब्ध झालेली नाही. रशियामध्ये हा फोन ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सिटीलिंकच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आला आहे. यासोबतच कंपनीने १२ महिन्यांची वॉरंटी दिली आहे. HTC Wildfire E3 Plus ची वैशिष्ट्ये: हे डिव्हाइस Android 11 वर काम करते. यात ६.८२ इंच HD+ मल्टी-टच डिस्प्ले आहे. हा फोन ६० Hz रिफ्रेश रेटसह येतो. हा फोन Unisoc Tiger T610 प्रोसेसरने सुसज्ज आहे. यात ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज आहे जे मायक्रोएसडी कार्डद्वारे वाढवता येते. फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. त्याचा प्रायमरी सेन्सर १३ मेगापिक्सेलचा आहे. दुसरा ५ मेगापिक्सेलचा आहे. इतर दोन २ मेगापिक्सेल सेन्सर आहेत. सेल्फीसाठी फोनमध्ये ८-मेगापिक्सेल कॅमेरा आहे. फोनमध्ये ४६००० mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G LTE, WiFi, Bluetooth V5, USB Type-C पोर्ट आणि ३.५ mm हेडफोन जॅक सारखे फीचर्स देखील देण्यात आले आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FcK4ms

Comments

clue frame