boAt Smartwatch: ब्लड ऑक्सिजन सेंसर आणि शानदार डिस्प्लेसह boat ची नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच, किंमत फक्त..
नवी दिल्ली : ने भारतात आपली नवीन boAt Iris ला लाँच केले आहे. ही स्वस्त स्मार्टवॉच असून, यामध्ये एमोलेड डिस्प्ले दिला आहे. तसेच, ब्लड ऑक्सिजन लेव्हल चेक करण्यासाठी SpO2 सेंसर देखील मिळेल. वॉचला तीन रंगात खरेदी करू शकता. वाचा: ची किंमत ४,४९९ रुपये आहे. ग्राहक वॉचला आजपासून कंपनीच्या अधिकृत वेबसाइट आणि फ्लिपकार्टवरून खरेदी करू शकतील. वॉच अॅक्टिव्ह ब्लॅक, फ्लेमिंग रेड आणि नेव्ही ब्लू रंगात उपलब्ध आहे. boAt Iris चे फीचर्स वॉचमध्ये राउंड शेप डायल दिली आहे. यात १.३९ इंच ४६२ppi HD AMOLED डिस्प्ले दिला आहे. वियरेबलमध्ये यूजर्सला क्लाउड बेस्ट अनेक वॉच फेस मिळतात. या वॉच फेसला यूजर्स boAt Hub अॅपद्वारे कस्टमाइज करू शकतात. बोटच्या या वॉचमध्ये कॉल, टेक्स्ट, सोशल मीडिया नॉटिफिकेशन्स, सिडेंट्री अलर्ट्स आणि अलार्म देखील मिळेल. यात २४x७ हार्ट रेट मॉनिटर आणि ब्लड ऑक्सिजन तपासण्यासाठी SpO2 सेंसर मिळते. Boat Iris मध्ये अनेक स्पोर्ट्स मोड्स आणि डेली अॅक्टिव्हिटी ट्रॅकर दिले आहे. याद्वारे तुम्ही किती स्टेप्स चालला आहात व किती कॅलरी बर्न केली आहे, याची माहिती मिळेल. यात ८ बिल्ट-इन अॅक्टिव्ह स्पोर्ट्स मोड्स देखील यूजरला मिळतील. वॉचला पाण्यापासून सुरक्षेसाठी आयपी६८ रेटिंग मिळाले आहे. कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये वॉच ७ दिवस टिकते. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3efqWsh
Comments
Post a Comment