४ जानेवारीला येतोय रियलमीचा हा स्मार्टफोन, जबरदस्त फीचर्स मिळतील

नवी दिल्लीः रियलमी सध्या आपला नवीन स्मार्टफोन ला लाँच करण्याची तयारी करीत आहे. कंपनी या फोनवरून ४ जानेवारी रोजी पडदा हटवणार आहे. लाँचिंगच्या काही दिवसांआधीच हा फोन बेंचमार्किंग वेबसाइट गीकबेंचवर पाहिला गेला आहे. गीकबेंच लिस्टिंगवरून या अपकमिंग स्मार्टफोनचे खास फीचर्स आणि स्पेसिफिकेशनची माहिती उघड झाली आहे. जाणून घ्या डिटेल्स. मिळतील हे फीचर आणि स्पेसिफिकेशन गीकबेंच लिस्टिंगच्या माहितीनुसार, रियलमी GT 2 १२ जीबी रॅम सोबत येईल. तसेच यात कंपनी क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेट ऑफर करणार आहे. गीकबेंचच्या सिंगल कोर टेस्ट मध्ये या फोनला ११२५ आणि मल्टी कोर टेस्ट मध्ये ३२७८ चा स्कोर मिळाला आहे. हा फोन अँड्रॉयड १२ ओएस वर काम करतो. गीकबेंच आधी रियलमीचा हा फोन अनेक दुसऱ्या सर्टिफिकेशन वेबसाइट्सवर पाहिला गेला आहे. या लिस्टिंग आणि लिक्सच्या माहितीनुसार, फोनला दोन व्हेरियंट ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज आणि १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेज मध्ये आणले जाणार आहे. फोनमध्ये ६.६२ इंचाचा फुल एचडी प्लस अमोलेड डिस्प्ले पाहायला मिळणार आहे. लीक रेंडर्सला पाहून म्हटले जाऊ शकते की, कंपनी फोनच्या रियर मध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप ऑफर करणार आहे. या फोनमध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी लेन्स सोबत एक ८ मेगापिक्सलचा डेप्थ किंवा मायक्रो सेन्सर दिला जावू शकतो. या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. ही बॅटरी ६५ वॉटच्या फास्ट चार्जिंग सोबत येऊ शकते. कंपनी आपल्या नवीन सीरीज अंतर्गत तीन स्मार्टफोन रियलमी GT 2, GT 2 Pro आणि एक कॅमेरा फोकस्ड मॉडल आणू शकते. रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, कंपनी या सीरीजचे प्रो व्हेरियंट मध्ये दमदार स्नॅपड्रॅगन 8 जेन 1 प्रोसेसर ऑफर करणार आहे. यात १ टीबी पर्यंत स्टोरेज ऑप्शन सुद्धा दिला जावू शकतो. स्मार्टफोन्सची किंमत किती असू शकते, यासंबंधी अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. वाचाः वाचाः वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Jm10t8

Comments

clue frame