'हे' अॅप्स डाउनलोड करू नका, जिओ यूजर्संना कंपनीकडून अलर्ट, अशी खबरदारी घेण्याचे ईमेलवरून केले आवाहन

नवी दिल्लीः रिलायन्स जिओ () ने वाढत्या सायबर फ्रॉड्सवरून सोमवारी आपल्या ग्राहकांना अलर्ट केले आहे. रिलायन्स जिओने म्हटले की, त्यांनी आपल्या ग्राहकांच्या सुरक्षेला नेहमीच प्राधान्य दिले असून कंपनीसाठी सुरक्षा नेहमीच महत्वपूर्ण राहिली आहे. मुकेश अंबानी यांच्या टेलिकॉम कंपनीने आपल्या ग्राहकांना ई-मेल नोटिफिकेशन मध्ये म्हटले की, जिओ मध्ये सिक्योरिटी आमच्यासाठी खूपच महत्त्वाची आहे. परंतु, काही दिवसांपासून सायबर फ्रॉड्सशी संबंधित काही केसेस आमच्यासमोर आल्या आहेत. ज्यात हॅकर्स स्वतःला जिओचे प्रतिनिधी असल्याचे खोटे सांगत आहेत. पेंडिंग (नो योर कस्टमर) च्या बहाण्याने तुमचे आधार, बँक अकाउंट्स, ओटीपी आदी संबंधित माहिती मिळवतात. हॅकर्स काय करतात, कंपनीने सांगितले रिलायन्स जिओने सांगितले की, हॅकर्स दावा करतात की, e-KYC पूर्ण न केल्यास तुमच्या जिओच्या सर्विसवर परिणाम होईल. हे इकॉनॉमिक टाइम्सच्या एका रिपोर्ट मध्ये म्हटले आहे. रिलायन्स जिओने हॅकर्सच्या पूर्ण कार्य प्रणाली संबंधी सांगितले आहे. सर्व माहिती विचारण्यासाठी ग्राहकांना एक कॉल बॅक नंबर दिला जातो. ज्यावेळी कस्टमर त्या नंबरवर कॉल बॅक करतो. त्यावेळी एक थर्ड पार्टी अॅप इंस्टॉल करण्यास सांगितले जाते. या थर्ड पार्टी अॅपद्वारे हॅकर्स ग्राहकांना फोन आणि डिव्हाइस संबंधित बँक अकाउंट्स पर्यंत पोहोचतात. रिमोट अॅक्सेस अॅप्स डाउनलोड करू नकाः जिओ रिलायन्स जिओच्या माहितीनुसार, कंपनी कधीच ग्राहकांना थर्ड पार्टी अॅप्स डाउनलोड करण्यास सांगत नाही. कारण, ग्राहकांना आवश्यक माहिती MyJio App मध्ये दिलेली आहे. जिओने ग्राहकांना सल्ला दिला आहे की, कोणतीही संशयित लिंक अटॅचमेंट वर क्लिक करू नका. सोबत कोणत्याही अज्ञात नंबरला उत्तर देऊ नका. त्यांना परत कॉल करू नका. तसेच रिमोट अॅक्सेस अॅप्सला डाउनलोड करू नका. कारण, असं केल्यास तुमच्या फोनची संपूर्ण माहिती हॅकर्सच्या हातात जाईल. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ewU4eu

Comments

clue frame