एका दिवसाचा खर्च फक्त ४.७ रुपये, ८४ दिवस चालणारा सर्वात स्वस्त रिचार्ज प्लान, डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग

नवी दिल्लीः देशातील तीन खासगी टेलिकॉम कंपन्या , , ने आपल्या रिचार्ज प्लानच्या किंमतीत वाढ केली आहे. परंतु, अजूनही काही प्लान तुम्हाला खूपच स्वस्त किंमतीत शानदार बेनिफिट्स ऑफर मध्ये खरेदी करता येईल. आज आम्ही तुम्हाला अशा काही प्लान्स संबंधी माहिती देत आहोत. जो प्लान ८४ दिवसांच्या प्लानमध्ये सर्वात स्वस्त प्लान आहे. हा प्लान रिलायन्स जिओचा प्लान आहे. ३९५ रुपयात ८४ दिवसाची वैधता रिलायन्स जिओकडे सर्वात स्वस्त ८४ दिवसाचा प्लान आहे. याची किंमत ३९५ रुपये आहे. म्हणजेच एका दिवसाचा खर्च फक्त ४.७ रुपये आहे. प्लानमध्ये तुम्हाला एकूण ६ जीबी डेटा दिला जातो. या डेटाचा वापर वैधतेपर्यंत केला जावू शकतो. याशिवाय, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, एकूण १ हजार एसएमएस दिले जाते. सोबत JioTV, JioCinema, JioSecurity आणि JioCloud अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. Vodafone idea चा सर्वात स्वस्त ८४ दिवसाचा प्लान वोडाफोन आयडियाचा ४५९ रुपयाचा सर्वात स्वस्त ८४ दिवसाचा रिचार्ज प्लान आहे. या प्लानमध्ये ग्राहकांना मोठी वैधता मिळते. या प्लानमध्ये ६ जीबी डेटा बेनिफिट, १ हजार एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. प्लानमध्ये व्हीआय मूव्हीज आणि टीव्हीचे अॅक्सेस सुद्धा मिळते. एअरटेलचा सर्वात स्वस्त ८४ दिवसाचा रिचार्ज प्लान एअरटेलकडे ४५५ रुपयाचा प्लान असून यात ८४ दिवसाची वैधता मिळते. यात वोडाफोन आयडिया प्रमाणे एकूण ६ जीबी डेटा बेनिफिट, ९०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. याशिवाय, Prime Video फ्री ट्रायल, फ्री हेलोट्यून्स, विंक म्यूजिक फ्री सारख्या सुविधा मिळतात. वाचाः वाचाः वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3101qEb

Comments

clue frame