फक्त ५.५५ रुपयांत मिळेल १ जीबी डेटा, एअरटेलचे ४ बेस्ट डेटा बूस्टर पॅक, किंमत १०० रुपयांपासून सुरुवात

नवी दिल्लीः जर एअरटेलचे पोस्टपेड ग्राहक असाल तर तुमच्यासाठी ही माहिती महत्त्वाची आहे. कंपनी काही जबरदस्त डेटा बूस्टर पॅक देत आहे. डेटा बूस्टर पॅक यूजर्संना खूपच कमी किंमतीत हाय स्पीड ४जी डेटा देते. सध्या कंपनीकडून ऑफर करण्यात आलेले चार डेटा बूस्टर पॅक आहेत. याची किंमत १०० रुपयांपासून सुरू होते. तसेच ५०० रुपयांपर्यंत जाते. जर तुम्ही एअरटेलचे पोस्टपेड ग्राहक असाल तर तुम्हाला या डेटा बूस्टर पॅक संबंधी माहिती असायला हवी. जाणून घ्या डिटेल्स. भारती एअरटेलने एकूण चार डेटा बूस्टर पॅक आणले आहे. पाहा यादी. १. पहिला पॅक १०० रुपयात येतो. हा एअरटेलचा सर्वात जास्त विकला जाणार प्लान सुद्धा आहे. या पॅक सोबत यूजर्संना १५ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच यूजर्संना १ जीबी डेटाची किंमत ६.६६ रुपये पडते. २. दुसरा पॅक हा २०० रुपयात येतो. यात ३५ जीबी डेटा मिळतो. म्हणजेच १ जीबी डेटाची किंमत ५.७१ रुपये आहे. जी वरच्या प्लानच्या तुलनेत १ रुपया जास्त आहे. ३. तिसरा पॅक हा ३०० रुपयात येतो. यात ५० जीबी डेटा मिळतो. म्हणजेच या प्लानमधील १ जीबी डेटाची किंमत ६ रुपये आहे. ४. चौथ्या पॅकची किंमत ५०० रुपये आहे. यात ९० जीबी डेटा मिळतो. म्हणजेच १ जीबी डेटाची किंमत ५.५५ रुपये आहे. हा प्लान खूपच कमी किंमतीत १ जीबी डेटा देतो. भारती एअरटेलकडून पोस्टपेड ग्राहकांसाठी हे चार डेटा बूस्टर पॅक आहे. डेटा बूस्टर प्रत्येक महिन्याला ऑटोमॅटिकली रिन्यू होतात. ३९९ मध्ये एअरटेलचा सर्वात स्वस्त ब्रॉडबँड प्लान जर तुम्ही भारती एअरटेलचे पोस्टपेड सब्सक्राइबर होण्याचा विचार करीत असाल तर याच्या ३९९ रुपये प्रति महिना सर्वात स्वस्त पोस्टपेड प्लान पाहू शकता. ४९९ रुपये, ९९९ रुपये आणि १५९९ रुपये महिन्यासोबत आणखी प्लान्स उपलब्ध आहेत. ४९९ रुपये आणि त्यापेक्षा वरच्या प्लानमध्ये ओटीटीचा लाभ मिळतो. वाचा वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Jieu9j

Comments

clue frame