नवी दिल्ली: तुम्हा सर्वांनी ATM () मशिन वापरले असेल आणि त्यातून रोख रक्कमही काढली असेल. या दरम्यान तुम्हाला काही आवाज ऐकू येत असल्याचे तुमच्या लक्षात आले असेल. हा आवाज Cash Counting आणि वितरणाचा वाटत असला तरी आता त्याबाबत लोकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला आहे. एटीएममधून येणारा हा आवाज पूर्णपणे बनावट असून तो स्पीकरच्या मदतीने तयार करण्यात असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अनेकजण सध्या चर्चाही करत आहेत. तुमच्याही मनातअसाच प्रश्न असेल तर जाणून घ्या सविस्तर. वाचा: काय आहे प्रकरण ? खरं तर, सोशल मीडियासह अनेक वेबसाइटवर असा दावा करण्यात आला आहे की, ATM मधून येणारा आवाज पूर्णपणे बनावट असतो आणि तो अनेक स्पीकरच्या मदतीने तयार केला जातो. ज्यामुळे युजर्सना त्यांचे Transaction पूर्ण होत असल्याचे समजते. यामुळे ATM वापरण्याचा अनुभवही सुधारतो आणि रांगेत उभ्या असलेल्या लोकांना त्यांचा टर्न येणार असल्याचे कळते. तसेच, एटीएम पूर्णपणे शांत असून त्यात कोणत्याही प्रकारचा आवाज येत नसल्याचा दावा देखील काहींनी केला आहे. खरं काय आहे? जर तुम्ही व्यवहार करताना एटीएमला टच केले असेल, तर तुमच्या लक्षात आले असेल की, त्यात अनेक प्रकारच्या Activities सुरु असतात. यामागील कारण म्हणजे, त्यात अनेक मोटर्स आणि बेल्ट असतात. ज्यातून रोख रक्कम वितरीत केली जाते आणि नंतर व्यवहार पूर्ण होतो. या दरम्यान, आपण जे आवाज ऐकतो ते प्रत्यक्षात तयार होतात आणि म्हणूनच हा आवाज स्पीकर्समधून निर्माण होतो असे वाटणाऱ्यांचा एक प्रकारचा गैरसमज आहे. कारण, transaction दरम्यान ATM मधून येणार आवाज पूर्णपणे खरा असतो. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3J0IN4e
Comments
Post a Comment