Airtel Black Plan: एकही रुपया खर्च न करता मिळवा Free हाय-स्पीड इंटरनेट, DTH आणि पोस्टपेड प्लान, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली: ब्रॉडबँडची जागा आता फायबर कनेक्‍शनने घेतली आहे. जे हाय-स्पीड इंटरनेट प्रदान करते. ज्याच्या मदतीने तुम्ही चित्रपट, गेम आणि व्हिडिओ कॉलचा आनंद घेऊ शकता. फायबर कनेक्शन घेण्यापूर्वी, लोकांना त्यांच्यासाठी कोणते इंटरनेट कनेक्शन सर्वोत्तम असेल हे समजून घेण्यात अडचण येते. अशात, एखाद्या कंपनीच्या फायबर कनेक्शनमध्ये तुमचे पैसे अडकले आणि तुम्हाला तिची सेवा आवडली नाही, तर तुम्हाला त्रास होऊ शकतो. वाचा: तुम्हाला एक महिना मोफत फायबर ट्रायल ऑफर करत असून तुम्ही ते एका महिन्यासाठी चांगले वापरू शकता आणि हे कनेक्शन तुमच्यासाठी कसे असेल ते ठरवू शकता. जर तुम्हाला हे कनेक्शन महिन्याभरानंतर आवडत असेल तर तुम्ही ते चालू ठेवू शकता आणि जर तुम्हाला ते आवडत नसेल तर तुम्ही एक रुपयाही खर्च न करता ते बंद करू शकता. काय फायदे आहेत: जर तुम्हाला तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये Airte Black इंस्टॉल करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला एक रुपयाही आकारला जाणार नाही. साधारणपणे तुम्ही फायबर कनेक्शन घेता तेव्हा तुमच्याकडून सिक्युरिटी मनी आणि राउटर बसवण्याच्या नावाखाली सुमारे २००० ते ३००० रुपये आकारले जातात. मात्र, एअरटेल ब्लॅकमध्ये अशी कोणतीही समस्या नाही. हे कनेक्शन तुम्हाला कोणत्याही शुल्काशिवाय ऑफर केले जाते आणि तुम्ही ते एका महिन्यासाठी वापरू शकता आणि नंतर तुम्हाला Airtel Black चे कनेक्शन घ्यायचे आहे की नाही हे ठरवू शकता. एकाच वेळी अनेक फायदे: साधारणपणे तुम्हाला फायबर कनेक्शनसह इतर कोणतेही फायदे दिले जात नाहीत. परंतु, एअरटेल ब्लॅक तुम्हाला फायबर कनेक्शन, पोस्टपेड फोन कनेक्शन, डीटीएच कनेक्शन आणि लँडलाइन कनेक्शनसह एक महिना ऑफर करत आहे. एका महिन्यासाठी तुम्हाला या सेवांसाठी एक रुपयाही आकारावा लागणार नाही. एक महिन्यानंतर तुम्ही तुमची पसंतीचा प्लान निवडून या सुविधा सुरू ठेवू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FuyPWQ

Comments

clue frame