नव्या वर्षात भारतीयांना 5G ची भेट!, सर्वात आधी या १३ शहरात सुरू होणार सर्विस, पाहा संपूर्ण लिस्ट

नवी दिल्लीः २०२२ या वर्षात भारतीयांना ५जी ची जबरदस्त भेट मिळणार आहे. दूरसंचार विभागाकडून ५जी इंटरनेट सर्विस टेस्टिंग अखेरच्या टप्प्यात पोहोचली आहे. ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. २०२२ मध्ये ही सर्विस देशात सुरू होणार आहे. सर्वात आधी देशातील १३ शहरात ही सर्विस सुरू केली जाणार आहे. विभागाने १३ शहराची लिस्ट जारी केली आहे. दूरसंचार विभाग (DoT) ने अधिकृतपणे जारी केले की, एअरटेल, जिओ आणि वोडाफोन आयडिया सह टेलिकॉम सर्विस प्रोव्हाइडर्सने गुरुग्राम, बेंगळुरु, कोलकाता, मुंबई, चंदीगढ़, दिल्ली, जामनगर, अहमदाबाद, चेन्नई, हैदराबाद, लखनऊ, पुणे आणि गांधीनगर मध्ये ५जी ट्रायल साइट सेटअप केली आहे. या महानगरात आणि मोठ्या शहरात पुढील वर्षी सर्वात आधी ५जी सर्विस सुरू केली जाणार आहे. विभागाच्या माहितीनुसार, टेस्टिंग प्रोजेक्ट मध्ये २२४ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. दूरसंचार विभाग डॉट च्या माहितीनुसार, मार्च एप्रिल २०२२ मध्ये ५ जी स्पेक्ट्रमचा लीलाव होण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षी सप्टेंबर मध्ये मूल्य, बँड प्लान, ब्लॉक साइज व स्पेक्ट्रम क्वॉन्टमच्या संबंधात ट्रायकडून शिफारस मागितली आहे. नियामक ने सर्व हितधारक कंपन्यांशी चर्चा सुरू केली आहे. ८ एजन्सीसोबत केली होती पार्टनरशीप दूरसंचार विभागाने २०१८ मध्ये सुरू केलेल्या ५ जी टेस्टिंग प्रोजेक्टसाठी ८ एजन्सी सोबत पार्टनरशीप केली होती. टेस्टिंग ३१ डिसेंबर २०२१ पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. या एजन्सीमध्ये आयआयटी मुंबई, आयआयटी हैदराबाद, आयआयटी मद्रास, आयआयटी कानपूर, इंडियन इंस्टिट्यूट ऑफ सायन्स (आयआयएसी) बेंगळूरू, सोसायटी फॉर एप्लॉयड मायक्रोवेव इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियरिंग अँड रिसर्च आणि सेंटर फॉर एक्सलेंस इन वायरलेस टेक्नोलॉजी यांचा समावेश आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3Jo3ozB

Comments

clue frame