Xiaomi: शाओमी भारतात लाँच करणार ३ नवीन स्मार्टफोन्स, पॉवरफुल प्रोसेसर-बॅटरीसह मिळेल शानदार फीचर्स

नवी दिल्ली : भारतीय बाजारात सीरिजमधील लवकरच लाँच करणार आहे. अधिकृत लाँच तारखेच्याआधी रिपोर्टमध्ये याचा खुलासा झाला आहे. केवळ Mi 11T सीरिज नाहीतर इतरही फोन आणि गॅजेट्स भारतात लवकरच लाँच होणार आहे. भारतात Xiaomi 11T, आणि Redmi 10 (2022) ला लाँच करेल. वाचा: तसेच, शाओमी Redmi Smart Band Pro, Redmi Watch 2, Watch 2 Lite आणि Watch S1 Active ला देखील लाँच करण्याच्या तयारीत आहे. मात्र, अद्याप कंपनीने अधिकृत लाँचिंग तारखेची माहिती दिलेली नाही. हे सर्व डिव्हाइस पुढील काही आठवड्यात लाँच होऊ शकतात. Xiaomi 11T, 11T Pro आणि Redmi 10 (2022) चे स्पेसिफिकेशन्स Xiaomi 11T मध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट, ४८० हर्ट्ज टच रिस्पॉन्स रेट आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्ट्स लेअरसह ६.६७ इंच FHD+ डिस्प्ले दिला आहे. यामध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह १०८ मेगापिक्सल मुख्य सेंसर, ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल सेंसर आणि एक टेली मॅक्रो कॅमेरा मिळेल, जो ३एक्स झूम प्रदान करतो. तर फ्रंटला १६ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळतो.फोनमध्ये साउड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर, मीडियाटेक डायमेंशन १२०० चिपसेट आणि ५००० एमएएचची बॅटरी मिळेल. Xiaomi 11T Pro मध्ये Xiaomi 11T सारखाच डिस्प्ले दिला आहे. यात क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८८८ चिपसेटसह १२ जीबीपर्यंत रॅम मिळेल. यात देखील समान बॅटरी मिळेल, मात्र १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. Xiaomi 11T Pro मध्ये Xiaomi 11T स्मार्टफोनमध्ये मिळणाऱ्या कॅमेरा सेंसरसह ८ मेगापिक्सल टेलिमॅक्रो सेंसर दिला जाईल. यात डॉल्बी एटमॉससह ड्यूल हार्मन कार्डन स्पीकर आणि सिक्योरिटीसाठी साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. Redmi 10 (2022) तीन व्हेरिएंटमध्ये लाँच होईल. यात ४ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज, ४ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज आणि ६ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेजचा समावेश आहे. Xiaomi 11T Pro प्रमाणेच रेडमी १० देखील व्हाइट, ब्लू आणि ग्रे रंगात येईल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3HR4D9E

Comments

clue frame