Xiaomi: धमाकेदार ऑफर! शाओमीच्या ‘या’ शानदार ५जी स्मार्टफोनवर ७ हजार रुपयांची सूट, मिळतात दमदार फीचर्स
नवी दिल्ली : इंडियाच्या फॅब फोन्स फेस्टला सुरुवात झाली आहे. २८ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या सेलमध्ये शाओमीचा लोकप्रिय ५जी Xiaomi 11 Lite NE 5G ला बंपर डिस्काउंटसह खरेदी करण्याची संधी आहे. सेलमध्ये हा फोन ५ हजार रुपये स्वस्त मिळेल. डिस्काउंटनंतर फोनला ३१,९९९ रुपयांऐवजी २६,९९९ रुपयात खरेदी करू शकता. ही ऑफर फोनच्या ६ जीबी रॅम आणि १२८ जीबी इंटर्नल स्टोरेज व्हेरिएंटची आहे. वाचा: फोनला खरेदी करताना एसबीआयच्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास २ हजार रुपयांपर्यंत अतिरिक्त डिस्काउंट दिले जात आहे. आयसीआयसीआय बँकेच्या क्रेडिट कार्डवर २ हजार रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळेल. डिस्काउंट आणि बँक ऑफरचा लाभ मिळाल्यास फोनवर एकूण ७ हजार रुपयांपर्यंत सूट मिळेल. Xiaomi 11 Lite 5G NE चे फीचर आणि स्पेसिफिकेशन 11 Lite 5G NE फोनमध्ये ६.५ इंच फुल एचडी+ डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल, रिफ्रेश रेट ९० हर्ट्ज आहे. फोनमध्ये ८ जीबीपर्यंत रॅम आणि २५६ जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळते. फोनमध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन ७७८जी चिपसेट दिला आहे. फोटोग्राफीसाठी यात रियरला एलईडी फ्लॅशसह तीन कॅमेरे मिळतात. फोनमध्ये ६४ मेगापिक्सल प्रायमरी सेंसरसह ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि एक ५ मेगापिक्सल टेली मॅक्रो सेंसर दिला आहे. सेल्फीसाठी फोनमध्ये २० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. पॉवरसाठी यात ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४,२५० एमएएचची बॅटरी दिली आहे. वाचा: वाचा वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l7t6hr
Comments
Post a Comment