नवी दिल्ली: इयरफोन लवकरच भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी लाँच केले जाऊ शकतात, कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत लाँच तारीख उघड केलेली नसली तरी अलीकडेच एका टिपस्टरने सूचित केले आहे की Xiaomi ब्रँडचा हा आगामी True Wireless Stereo (TWS Earbuds) भारतात पुढील महिन्यात म्हणजे डिसेंबर २०२१ किंवा जानेवारी २०२२ मध्ये लाँच केला जाऊ शकतो. वाचा: हे इअरबड्स या वर्षी सप्टेंबरमध्ये चिनी बाजारात लाँच करण्यात आले होते. टिपस्टर मुकुल शर्मा यांनी भारतात Xiaomi TWS 3 Pro लाँच संबंधित माहिती शेअर केली आहे. Xiaomi TWS 3 Pro Earbuds ची भारतात किंमत: रिपोर्टनुसार, Xiaomi ब्रँडच्या या बड्सची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे, असे सांगितले जात आहे की बड्ससोबत कंपनी नवीन स्पीकरची घोषणा देखील करू शकते. हे इयरबड्स सप्टेंबरमध्ये CNY ६९९ (सुमारे ८,००० रुपये) मध्ये चीनी बाजारात हिरव्या , काळ्या आणि पांढऱ्या अशा तीन कलर व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आले होते. Xiaomi TWS 3 Pro अॅडॅप्टिव्ह ANC म्हणजेच अॅक्टिव्ह नॉईज कॅन्सलेशन वैशिष्ट्य आणि अॅम्बियंट मोड, व्हॉइस-एनहांसिंग मोड आणि थ्री-स्टेज नॉइज रिडक्शन या वैशिष्ट्यांसह येतात. बड्स ४० dB पर्यंत जास्तीत जास्त आवाज कमी करण्यास सक्षम आहेत. सक्रिय नॉईज कॅन्सलेशन वैशिष्ट्य अक्षम असतानाही हे बड्स ६ तासांची बॅटरी लाइफ देतात आणि चार्जिंग केससह बॅटरी २७ तासांपर्यंत काम करतात. वाचा: वाचा: वाचा:
from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xjKlku
Comments
Post a Comment