Wireless Earbuds: २० तासांची बॅटरी लाइफ आणि ANC सपोर्टसह Noise चे नवीन इयरबड्स भारतात लाँच, पाहा किंमत

नवी दिल्ली : ने भारतीय बाजारात आपले नवीन Noise Air Buds Pro ला लाँच केले आहे. इयरबड्सच्या प्रमुख फीचर्सबद्दल सांगायचे तर यात टच कंट्रोलसह अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशन फीचर दिले आहे. च्या किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया. वाचा: Noise Air Buds Pro ची किंमत Noise Air Buds Pro ला तुम्ही २,४९९ रुपयात खरेदी करू शकता. अधिकृत वेबसाइट्स आणि वर हे बड्स व्हाइट, ब्लॅक आणि ब्लू रंगात उपलब्ध आहे. Noise Air Buds Pro चे फीचर्स या इयरबड्समध्ये १० एमएमचे स्पीकर ड्रायव्हर दिले आहे. तसेच २५डीबीपर्यंत आवाज कमी करण्यासाठी अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशन फीचर मिळतात. एसबीसी ऑडिओ कोडक सपोर्टसह ब्लूटूथ व्हर्जन ५ दिले आहे, ज्याची रेंज १० मीटर आहे. या इयरबड्सला इन-इयर डिझाइन आणि सिलिकॉन टिप्ससह लाँच केले आहे, जेणेकरून यूजर्सला आरामदायी अनुभव मिळेल. कॉलिंगसाठी प्रत्येक बडमध्ये मायक्रोफोन्स दिले आहे. Noise Earbuds अँड्राइड आणि आयओएस दोन्ही डिव्हाइसशी कनेक्ट होतात. यूजर्सच्या सुविधेसाठी यात टच कंट्रोल फंक्शन दिले आहे. याच्या मदतीने कॉलला उत्तर देता येईल, म्यूझिक प्लेबॅक कंट्रोल, गुगल असिस्टेंट आणि सिरी कमांड, वॉल्यूम एडजस्ट करता येईल. इयरबड्सला चार्ज होण्यास १.५ तास लागतात. तर चार्जिंग केस यूएसबी टाइप सी केबलद्वारे १ तासात चार्ज होते. वॉटर आणि स्वेट रेसिस्टेंटसाठी इयरबड्स IPX५ रेटिंग मिळाले आहे. चार्जिंग केससह २० तासांची बॅटरी लाइफ आणि इयरबड्स सिंगल चार्जवर ४ तास टिकतात. कंपनीनुसार, अ‍ॅक्टिव्ह नॉइस कॅन्सिलेशन मोड सुरू असल्यास बॅटरी ३.५ तासच टिकते. तर चार्जिंग केससोबत १४ तासांची बॅटरी लाइफ मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3d1l4SG

Comments

clue frame