WhatsApp: व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आले 'हे' कमालचे टूल, स्वतःच्या फोटोला बनवता येणार स्टीकर, पाहा प्रोसेस

नवी दिल्ली : इंस्टंट WhatsApp ने आपल्या यूजर्ससाठी खास टूल लाँच केले आहे. याच्या मदतीने यूजर्स कोणत्याही फोटोला स्टीकरमध्ये बदलू शकतात. हे फीचर सध्या वेब व्हर्जनसाठी उपलब्ध झाले आहे. लवकरच मोबाइल व्हर्जनसाठी देखील हे फीचर जारी करण्यात येणार आहे. याआधी कंपनीने यूजर्ससाठी म्यूट व्हिडिओ फीचर जारी केले होते. याद्वारे व्हिडिओच्या आवाजाला म्यूट करू शकता. वाचा: असे काम करते नवीन टूल
  • ज्या यूजरला कस्टम पाठवायचे आहे, त्याची चॅट विंडो ओपन करा.
  • त्यानंतर क्लिप आयकॉनवर टॅप करा.
  • आता तुम्हाला स्टीकरचा पर्याय दिसेल, त्यावर टॅप करा.
  • आता फोटो तुम्हाला पाहिजे तसा एडिट करा.
  • त्यानंतर तुमच्या फोटोचा स्टीकर तयार होईल व या स्टिकला तुम्ही शेअर करू शकता.
लवकरच येणार हे शानदार फीचर यूजर्ससाठी लवकरच नवीन अपडेट रिलीज करणार आहे. या अपडेटमध्ये यूजर्सला इतरांपासून स्टेट्स लपवण्याचा पर्याय मिळेल. यासाठी यूजर्सला सेटिंगमध्ये My Contacts Expect चा पर्याय मिळेल. कंपनीने अद्याप फीचरबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही. मात्र, लवकरच हा पर्याय उपलब्ध होईल. दरम्यान, याआधी WhatsApp ने मार्चमध्ये यूजर्ससाठी Mute Video नावाचे एक फीचर सादर केले होते. या फीचरच्या माध्यमातून यूजर्सला व्हिडिओ पाठविण्याआधी त्याचा आवाज म्यूट करता येतो. यामुळे दुसऱ्या यूजर्सला विना आवाजाचा व्हिडिओ मिळेल. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cKpD3R

Comments

clue frame