WhatsApp Upcoming Features: WhatsApp चे हे पाच फीचर्स लवकरच लाँच होणार, 'हे' फायदे मिळणार, जाणून घ्या

नवी दिल्लीः WhatsApp Upcoming Features: WhatsApp जगातील सर्वात पॉप्यूलर मेसेजिंग अॅप आहे. व्हाट्सअॅपने आपल्या यूजर्संचा एक्सपीरियन्स आणखी चांगला बनवण्यासाठी मोठ्या संख्येत नवीन फीचर्स लाँच केले आहेत. याशिवाय, कंपनी आता काही निवडक फीचर्स वर काम करीत आहे. ज्यात स्टेबल अँड्रॉयड आणि iOS यूजर्ससाठी रिलीज केले जावू शकते. आज आम्ही व्हाट्सअॅपच्या अपकमिंग फीचर्स संबंधीत माहिती सांगणार आहोत. जाणून घ्या डिटेल्स. Delete Message for everyone व्हाट्सअॅपचे आपले सर्वात खास फीचर Delete Message for Everyone चा टाइम लिमिट वाढवण्यासाठी काम करीत आहे. नवीन अपडेटला यूजर्ससाठी लवकरच रिलीज केले जावू शकते. नवीन अपडेट नंतर यूजर्स व्हाट्सअॅप वर पाठवण्यात आलेल्या मेसेजला एका आठवड्याच्या आत डिलीट करू शकता. सध्या यूजर्सला पाठवण्यात आलेले मेसेज एका तासाच्या आत डिलीट करू शकता. Custom sticker व्हाट्सअॅप ने नुकतेच आपल्या वेब यूजर्ससाठी Custom sticker फीचर टूल आणले होते. या अंतर्गत यूजर्स आपल्या फोटोला स्टिकर मध्ये बदलू शकतात. सध्या हे फीचर मोबाइल यूजर्संसाठी उपलप्ध नाही आहे. परंतु, असे मानले जात आहे की, कंपनी कस्टम स्टिकर टूलला लवकरच आपल्या अँड्रॉयड आणि आयओएस यूजर्ससाठी लाँच करू शकते. Voice notes वेब बीटा इन्फोच्या माहितीनुसार, मेसेजिंग अॅप व्हाट्सअॅप एक अशा सुविधेवर काम करीत आहे. ज्यात यूजर्संना व्हाइस नोट्सच्या स्पीडला वाढू शकतील. त्यामुळे असा अंदाज लावला जात आहे की, या अपडेटला डिसेंबरच्या अखेरपर्यंत किंवा नवीन वर्षाच्या सुरुवातीला रिलीज केले जावू शकते. सध्या व्हाट्सअॅप कडून या अपडेटच्या लाँचिंगवरून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. WhatsApp Hide Status व्हाट्सअॅप आपल्या प्लॅटफॉर्मवर एक नवीन फीचर जोडण्याची तयारी करीत आहे. याच्या मदतीने यूजर्स काही लोकांना आपले स्टेट्स लपवता येवू शकणार आहे. या फीचरला आगामी काही दिवसात स्टेबल व्हाट्सअॅप यूजर्ससाठी जारी केले जावू शकते. WhatsApp Communities मीडिया रिपोर्ट्सच्या माहितीनुसार, व्हाट्सअॅप आपल्या खास फीचरवर काम करीत आहे. याचे नाव Communities आहे. हे फीचर आल्यानंतर ग्रुप अॅडमिनचे व्हाट्सअॅप मध्ये अन्य ग्रुप वर जास्त कंट्रोल असेल. कम्यूनिटी चॅटचा लूक व्हाट्सअॅप ग्रुप चॅट प्रमाणे असेल. परंतु, यात छोटा बदल केला जाईल. सध्या या फीचरची लाँचिंगवरून कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. वाचाः वाचाः वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nVc1Jr

Comments

clue frame