WhatsApp Features: WhatsApp मध्ये लवकरच येणार नवीन फीचर, डिलीट करता येतील जुने मेसेजेस, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : हे खूप लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अॅप आहे. युजर्सचा अनुभव अधिक चांगला करण्यासाठी कंपनी नवीन फीचर्स जारी करत असते. आता एका रिपोर्टनुसार, व्हॉट्सअॅप Delete for everyone फीचरची वेळ मर्यादा वाढवण्यावर काम करत आहे. सध्या व्हॉट्सअॅपवर पाठवलेले मेसेज १ तास, ८ मिनिटे आणि १६ सेकंदात डिलीट केले जाऊ शकतात. अहवालानुसार, कंपनी ही वेळ मर्यादा वाढवण्यावर काम करत आहे. म्हणजेच या मुदतीनंतरही तुम्ही मेसेज डिलीट करू शकाल. जाणून घ्या याविषयी सविस्तर. वाचा: हे वैशिष्ट्य सध्या केवळ विकासाच्या टप्प्यात आहे. आत्तापर्यंत हे वैशिष्ट्य बीटा टेस्टर्ससाठी देखील उपलब्ध करून देण्यात आले नाही. यापूर्वी अशी बातमी आली होती की व्हॉट्सअॅप मेसेज डिलीट करण्याची मर्यादा हटवण्याचा विचार करत आहे. आता त्यात बदल होताना दिसत आहे. WABetaInfo ने याबाबत वृत्त दिले आहे. रिपोर्टनुसार, WhatsApp Desktop beta २.२१४७.४ मध्ये मेसेज डिलीट करण्याचे फीचर स्पॉट झाले आहे. या बीटा अपडेटनुसार, कंपनी वेळ मर्यादा ७ दिवस आणि ८ मिनिटांपर्यंत वाढवू शकते. WABetaInfo ने यासंदर्भात एक स्क्रीनशॉट देखील शेअर केला आहे. स्क्रीनशॉटमध्ये एक दिवस जुन्या मेसेजसाठी डिलीट करण्याचा पर्यायही देण्यात आला आहे. मात्र, व्हॉट्सअॅप फीचर डेव्हलपमेंट स्टेजवर असल्याने त्यात बदलही करता येऊ शकतात, असेही या अहवालात म्हटले आहे. या फीचरबाबत कंपनीचे अधिकृत स्टेटमेंट येतपर्यंत काहीही सांगता येणार नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3cMgSGp

Comments

clue frame