नवी दिल्लीः टेलिकॉम इंडस्ट्री मध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. एअरटेल आणि वोडाफोन आयडिया ने आपल्या प्रीपेड प्लान्सच्या किंमतीत घोषणा केली आहे. वोडाफोन आयडियाच्या प्लान्सच्या किंमतीत आजपासून वाढ झाली आहे. तर Airtel च्या प्लान्स मध्ये २६ नोव्हेंबर पासून वाढ होणार आहे. या निर्णयामुळे यूजर्संमध्ये खूप नाराजी पसरली आहे. यूजर्संना आता एकसारख्या बेनिफिट्ससाठी जास्त किंमत मोजावी लागणार आहे. यूजर्संची नाराजी पाहून वोडाफोन आयडिया आपल्या यूजर्संना एक नवीन ऑफर आणू शकते, याचे नाव Data Delight आहे. जाणून घ्या डिटेल्स. चा Data Delight ऑफर या ऑफर अंतर्गत यूजर्संना दर महिन्याला २ जीबी डेटा बॅकअप मिळेल. यासाठी यूजर्संना कोणताही अतिरिक्त चार्ज द्यावा लागणार नाही. ही ऑफर सर्वांना मिळणार नाही. ही ऑफर काही निवडक प्रीपेड प्लान्सवर दिली जाणार आहे. हे आहेत प्रीपेड प्लान्स जर तुम्ही Vodafone Idea च्या Data Delight ऑफरचा बेनिफिट घेणार असाल तर तुमच्या नंबरवर २९९ रुपये, ४७९ रुपये, ५०१ रुपये, ९०१ रुपये, ७१९ रुपये, ४७५ रुपये, ३५९ रुपये, ५३९ रुपये, ८३९ रुपये, २८९९ रुपये, ४०९ रुपये, १४४९ रुपये, ७०१ रुपये, ५९९ रुपये, ३९९ रुपये आणि ३०९९ रुपयाचा प्रीपेड प्लान अॅक्टिवेट असायला हवा. असा मिळवा ऑफरचा लाभ जर तुम्ही या ऑफरचा लाभ घेवू इच्छित असाल तर तुम्हाला तुमच्या नंबरवरून १२१२४९ (टोल फ्री) नंबरवर कॉल करावा लागेल. यासाठी तुम्हाला एक प्रोसेस सांगितली जाईल. यानंतर तुम्हाला त्याला फॉलो करावे लागणार आहे. त्यानंतर तुमच्या नंबरवर ही सर्विस अॅक्टिवेट होईल. जर तुम्हाला ही ऑफर मिळाली नाही तर त्याचे कारण सुद्धा तुम्हाला सांगितले जाईल. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nPQGRz
Comments
Post a Comment