Vodafone Idea: Vi ने पुण्यात केले ५जी ट्रायल, मिळाला भन्नाट स्पीड; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी () ने केले असून, या ट्रायलमध्ये कंपनीला जबरदस्त स्पीड मिळाला आहे. वीआयने हे ट्रायल पुणे आणि गांधीनगर या शहरात केले. वाचा: ५जी ट्रायलला एंटरप्राइजेज आणि भारतातील ग्राहकांना लक्षात घेऊन करण्यात आले आहे. यासाठी वीआयने हार्डवेअर कंपनी , सह L&T Smart World & Communication, Athonet, भारतीय स्टार्टअप्स Vizzbee आणि Tweek Labs सोबत भागीदारी केली आहे. दूरसंचार विभागाकडून वीआयला ५जी ट्रायल्ससाठी २६ GHz आणि ३.५ GHz स्पेक्ट्रम mmWave बँड देण्यात आला आहे. या ट्रायलमध्ये कंपनीला ३.५ GHz वर १.५ जीबीपीएस स्पीड मिळाला. याशिवाय ६ GHz वर ४.२ जीबीपीएस आणि ९.८ जीबीपीएस स्पीड बँड्सच्या backhaul वर मिळाला. पुण्यात टेस्टिंगसाठी वीआयने क्लाउड नेटिव्ह टेक्नोलॉजीवर आधारित बेस्ड Ericsson Radios आणि Ericsson Dual Mode Core चा वापर केला. पुण्यात ट्रायलसाठी Ericsson ने तयार केलेल्या ५जी टेक सॉल्यूशनचाच वापर करण्यात आला आहे. गांधीनगरमध्ये कंपनीने नोकियाच्या एअरस्केल रेडिओ पोर्टफोलिया आणि Microwave E-बँड सॉल्यूशनचा ५जी ट्रायलसाठी वापर केला. दरम्यान, कंपनीने आपल्या प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहे. कंपनीच्या बेस प्लानची किंमत ९९ रुपयांपासून सुरू होते. एअरटेलने देखील आपल्या प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहेत. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ldSVfM

Comments

clue frame