Vivo Smartwatch: हार्ट-रेट सेंसर आणि ५०१mAh बॅटरीसह येणार विवोची नवीन स्मार्टवॉच, फीचर्स

नवी दिल्ली : ने आपली पहिली Vivo Watch ला गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये लाँच केले होते. आता कंपनी नवीन वॉच वर काम करत आहे. या स्मार्टवॉचचे फोटो लीक झाले असून, यात डिझाइन दिसत आहे. सोबतच, वॉचचे काही फीचर्स देखील समोर आले आहेत. याआधी वॉच २ ला अनेक वेबसाइट्सवर पाहण्यात आले आहे. वाचा: Vivo Watch 2 चे संभाव्य स्पेसिफिकेशन रिपोर्टनुसार, विवोच वॉच २ चे तीन फोटो इंटरनेटवर लीक झाले आहेत. या फोटोमध्ये विवो वॉच २ चा लूक आधी लाँच झालेल्या विवो वॉच २ शी मिळता जुळता आहे. यात गोल डायल दिले आहे. ही वॉच लेदर आणि सिलिकॉन स्ट्रॅपसह येईल. तसेच, यात इन-बिल्ट जीपीएस, वॉइस कॉल सपोर्ट, स्टेप काउंटर आणि हार्ट रेट मॉनिटर सारखे फीचर्स मिळतील. यात पॉवरसाठी ५०१ एमएएचची दमदार बॅटरी दिली जाईल. Vivo Watch 2 ची संभाव्य किंमत विवो वॉच २ स्मार्टवॉचच्या लाँचिंग आणि किंमतीबाबत अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, स्मार्टवॉचला पुढील वर्षी लाँच केले जाऊ शकते व याची किंमत ५ ते १० हजार रुपये असण्याची शक्यता आहे. Vivo Watch विवो वॉचबद्दल सांगायचे तर याची किंमत १,२९९ युआन (जवळपास १४,०६७ रुपये) आहे. या वॉचमध्ये १.१९ इंच डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन ३९०x३९० पिक्सल आहे. यात २ जीबी रॅम आणि ST मिनिएचर चिपसेट मिळतो. वॉचमध्ये जीपीएस, ब्लूटूथ ५.० आणि ग्लोनास मिळेल. यात हार्ट-रेट, ब्लड ऑक्सिजन आणि एअर प्रेशर मॉनिटर सारखे हेल्थ फीचर्स दिली आहे. वॉचमध्ये दिलेली बॅटरी सिंगल चार्जमध्ये ९ दिवस टिकते. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3DXZV7D

Comments

clue frame