Vivo Smartphone: ५० मेगापिक्सल कॅमेऱ्यासह लाँच झाला विवोचा नवीन स्मार्टफोन, पाहा किंमत-फीचर्स

नवी दिल्ली : विवोने आपला नवीन Vivo V23e 5G ला लाँच केले आहे. विवोचा हा स्मार्टफोन मीडियाटेक डायमेंसिटी प्रोसेसर आणि ४ जीबी एक्सटेंडेड रॅम सपोर्टसह येतो. हा फोन अँड्राइड ११ वर काम करतो. फोनच्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Vivo V23e 5G चे स्पेसिफिकेशन्स स्मार्टफोनमध्ये ६.४४ इंच फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x2400 पिक्सल आहे. फोन फनटच ओएस १२ वर काम करतो. स्पीड आणि मल्टी टास्किंगसाठी यात MediaTek Dimensity ८१० SoC सह ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज मिळते. मायक्रोएसडी कार्डने स्टोरेजला १ टीबीपर्यंत वाढवू शकता. फोटोग्राफीसाठी फोनमध्ये बॅक पॅनेलवर तीन कॅमेरे दिले आहे. यात ५० मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह ८ मेगापिक्सल वाइड अँगल कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा तिसरा सेंसर दिला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी यात ४४ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ व्हर्जन ५.१, ड्यूल सिम, यूएसबी टाइप सी पोर्ट आणि ड्यूल वाय-फाय सपोर्ट मिळतो. सिक्योरिटीसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर मिळेल. पॉवरसाठी यात ४४ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४०५० एमएएचची बॅटरी मिळते. Vivo V23e 5G ची किंमत फोनच्या ८ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत १२,९९९ THB (जवळपास २९,२०० रुपये) आहे. फोन सनशाइन कोस्ट आणि मूनलाइट शेडो या रंगात येतो. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nLyIiY

Comments

clue frame