Truecaller: ट्रूकॉलरमध्ये कॉल रेकॉर्डिंगसह आले अनेक धमाकेदार फीचर्स, घोस्ट कॉलचाही मिळेल सपोर्ट

नवी दिल्ली : ने आपल्या बाराव्या एडिशनला लाँच केले आहे. नवीन अपडेटसह अ‍ॅपमध्ये अनेक नवीन फीचर्स दिले आहेत. ट्रूकॉलर अ‍ॅपमध्ये आता कॉल अलर्ट, कॉल रिझन, फुल स्क्रीन कॉल आयडी, इनबॉक्स क्लिनर, एसएमएस/कॉन्टॅक्ट बॅकअप आणि स्मार्ट एसएमएस सारखे फीचर्स मिळतील. अ‍ॅपमध्ये आता ४६ भाषांचा सपोर्ट दिला आहे. यावेळी कंपनी व्हिडिओ कॉलर आयडीसह नवीन इंटरफेस, कॉल रेकॉर्डिंग, आणि कॉल घोषणा ( कोणाचा फोन आला ते बोलून दाखवेल) सारखे फीचर्स दिले आहेत. पुढील काही आठवड्यात भारतासह इतर देशांमध्ये अँड्राइड यूजर्ससाठी नवीन अपडेट जारी केले जाईल. वाचा: Truecaller मध्ये येणार हे नवीन फीचर्स व्हिडिओ कॉलर आयडीद्वारे एक छोटा व्हिडिओ सेट करता येतो. तुमच्या मित्रांना अथवा कुटुंबातील सदस्यांना कॉल केल्यावर हा व्हिडिओ प्ले होतो. तुम्ही बिल्ट-इन व्हिडिओ टेम्प्लेटमधील एक व्हिडिओ निवडू शकता अथवा स्वतःचा देखील रेकॉर्ड करू शकता. नवीन इंटरफेस वेगळ्या टॅबसह आता तुम्हाला सर्व एसएमएस, ट्रूकॉलर ग्रुप चॅट आणि खासगी चॅटला एका टॅपवर अ‍ॅक्सेस करू शकता. कॉल रेकॉर्डिंग कॉल रेकॉर्डिंगला सुरुवातीला केवळ एक प्रीमियम फीचर म्हणून सादर केले होते. मात्र, आता हे फीचर मोफत जारी करण्यात आले आहे. कोणताही अँड्राइड यूजर आता ट्रूकॉलरवर मोफत कॉल रेकॉर्ड करू शकतो. सर्व रेकॉर्डिंग डिव्हाइस स्टोरेजमध्ये सेव्ह होईल. Truecaller द्वारे याला अ‍ॅक्सेस केले जाणार आहे. घोस्ट कॉल घोस्ट कॉल Truecaller मध्ये एक प्रँक कॉल फीचर आहे. घोस्ट कॉलद्वारे तुम्ही तुमच्या मित्र-मैत्रिणींशी मस्करी करू शकता. याद्वारे तुम्ही कोणतेही नाव, नंबर आणि फोटो सेट करू शकता. घोस्ट कॉल केवळ ट्रूकॉलर प्रीमियम आणि गोल्ड सबस्क्राइबर्ससाठी आहे. कॉल अनाउंस या फीचरद्वारे फोन आल्यानंतर ट्रूकॉलर कॉलिंगाबाबत अनाउंसमेंट करेल. हे फीचर सामान्य वॉइस कॉल आणि ट्रूकॉलर एचडी वॉइस कॉल दोन्हीवर काम करेल. वायरलेस हेडफोनला देखील हे फीचर सपोर्ट करते. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xllQDr

Comments

clue frame