Tecno Spark 8: ११ हजार रुपयात टेक्नोच्या स्मार्टफोनचे नवीन व्हेरिएंट लाँच, फोन खरेदीवर मोफत मिळेल इयरफोन्स
नवी दिल्ली : हँडसेट निर्माता कंपनी ने आपल्या लोकप्रिय स्पार्क सीरिजमधील स्मार्टफोनचे नवीन व्हेरिएंट लाँच केले आहे. फोनला ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेजमध्ये सादर केले आहे. फोन तीन नवीन रंगात उपलब्ध झाला आहे. यामध्ये मीडियाटेक प्रोसेसरचा सपोर्ट दिला आहे. फोनच्या नवीन व्हेरिएंटच्या किंमत आणि फीचर्सविषयी जाणून घेऊया. वाचा: Tecno Spark 8 चे स्पेसिफिकेशन्स डिस्प्ले: ६० हर्ट्ज रिफ्रेश रेटसह ६.५६ इंच एचडी+ डिस्प्ले दिला असून, याचा पीक ब्राइटनेस ४८० निट्स आहे. प्रोसेसर: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी यात मीडियाटेक हीलियो जी२५ चिपसेटचा सपोर्ट मिळतो. कॅमेरा: फोटोग्राफीसाठी रियर पॅनेलला १६ मेगापिक्सल ड्यूल कॅमेरा सेटअप दिला आहे. तर सेल्फी व व्हिडिओ कॉलिंगसाठी ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा मिळतो. बॅटरी: फोनमध्ये पॉवरसाठी ५००० एमएएचची दमदार बॅटरी दिली आहे. कनेक्टिव्हिटी: फोनमध्ये ब्लूटूथ व्हर्जन ५, चार्जिंगसाठी मायक्रो यूएसबी पोर्ट आणि वायरलेस कनेक्टिव्हिटीसाठी ड्यूल बँड वाय-फाय सपोर्ट मिळतो. Tecno Spark 8 ची किंमत Tecno Spark 8 च्या ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटला १०,९९९ रुपयात सादर केले आहे. लाँच ऑफर अंतर्गत फोनसोबत ७९९ रुपयांचा ब्लूटूथ इयरफोन आणि वन-टाइम फ्री स्क्रीन रिप्लेसमेंटची सुविधा मिळते. फोनच्या २ जीबी रॅम + ६४ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ७,९९९ रुपये, ३ जीबी रॅम + ३२ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ९,६२८ रुपये आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CKPaEw
Comments
Post a Comment