Tecno Smartphone: सर्वात स्वस्त स्मार्टफोन! ७ हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत शानदार हँडसेट लाँच, मिळते ५०००mAh बॅटरी

नवी दिल्ली : कंपन्या आता स्वस्त हँडसेट लाँच करत आहे. जिओने काही दिवसांपूर्वी भारतात JioPhone Next ला (६,४९९ रुपये) लाँच केले होते. आता टेक्नोने जवळपास त्याच किंमतीत स्मार्टफोनला लाँच केले आहे. कंपनीने स्मार्टफोनला ठराविक बाजारात लाँच केले आहे. दोन वेगवेगळ्या रंगात येणाऱ्या या फोनमध्ये ६.५२ इंच डिस्प्ले दिला असून, यात दोन रियर कॅमेरे, ऑक्टा-कोर यूनिसोक SC९६८३ प्रोसेसर आणि ५००० एमएएचची बॅटरी मिळते. वाचा: Tecno POP 5 LTE चे फीचर्स ड्यूल सिम सपोर्टसह येणारा हा फोन अँड्राइड १० गो एडिशनवर काम करतो. यात ६.५२ इंच एचडी+ आयपीएस एलसीडी (७२०x१५६० पिक्सल) डिस्प्ले दिला आहे. यात ऑक्टा-कोर यूनिसोक SC९६८३ प्रोसेसरसोबत ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी इंटर्नल स्टोरेज मिळते. स्टोरेजला मायक्रोएसडी क्रार्डने २५६ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोटोग्राफीसाठी यात ड्यूल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, याचा मुख्य सेंसर ८ मेगापिक्सल आणि दुसरा दोन मेगापिक्सल आहे. तर फ्रंटला सेल्फीसाठी ५ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात ब्लूटू वी४.२, जीपीएस, एफएम रेडिओ, ३.५ एमएम हेडफोन जॅक, मायक्रो यूएसबी पोर्ट, वाय-फाय, जीपीआरएस, ४ जी एलटीईसह अनेक शानदरा फीचर्स दिले आहे. फोनमध्ये रियर-माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर आणि फेशियल रिकॉग्निशनचा सपोर्ट मिळतो. यात एक्सेलेरोमीटर, जायरोस्कोप आणि प्रॉक्सिमिटी सेंसर दिला आहे. पॉवरसाठी ५००० एमएएचची बॅटरी मिळते. तसेच, फोनसोबत रिटेल बॉक्समध्ये एक चार्जर, एक प्रोटेक्टिव्ह शेल आणि यूएसबी केबल मिळते. Tecno POP 5 LTE ची किंमत कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर फोनच्या किंमतीचा खुलासा अद्याप करण्यात आलेला नाही. मात्र, फिलिपाइन्समधील ई-कॉमर्स वेबसाइट Shopee वर याची किंमत ४,५९९ PHP (जवळपास ६,८०० रुपये) पाकिस्ताना १५,०००PKR (जवळपास ६,३०० रुपये) आहे. फोन ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह येतो. फोनला डीप सी लस्टर आणि आइस ब्लू रंगात खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nOL1uV

Comments

clue frame