Smartwatch: ‘ही’ कंपनी लाँच करणार भन्नाट स्मार्टवॉच, थेट घड्याळाने अनलॉक होणार कार

नवी दिल्ली : तंत्रज्ञानामुळे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. स्मार्ट टीव्ही, स्मार्टफोन्सपासून ते स्मार्ट कार्स सर्वकाही इंटरनेट व टेक्नोलॉजीवर काम करते. आता चीनची निर्माता कंपनी ने आपल्या लेटेस्ट कारमध्ये एक नवीन फीचर दिले असून, यामुळे स्मार्टफोनसह स्मार्टवॉचने देखील गाडी अनलॉक करता येणार आहे. वाचा: स्मार्टवॉचमध्ये मिळतील अनेक शानदार फीचर्स रिपोर्टनुसार, BYD लवकरच या खास स्मार्टवॉचला लाँच करणार आहे. याद्वारे गाडी देखील अनलॉक करता येईल. स्मार्टवॉचमध्ये स्मार्ट इग्निशन, कंफर्टेबल एंट्री, स्मार्ट लॉकिंग, काचा वर-खाली करण्याची सुविधा, टेलगेट ओपन करण्याची सुविधा मिळेल. चावीची गरजच नाही BYD च्या या स्मार्टवॉचमध्ये गाडीला लॉक व अनलॉक करण्याचे फीचर मिळणार असल्याने गाडीसाठी चालकांना चावीची गरज नसेल. चावीशिवाय स्मार्टवॉचने गाडी चालू करता येईल. यामुळे चावी हरवण्याची भिती देखील राहणार नाही. वॉचमध्ये मिळतील हेल्थ फीचर्स या स्मार्टलॉचमध्ये एक सैफाइअर ग्लास स्क्रीन आणि रबर स्ट्रॅप्स मिळेल. यात स्टेप्स काउंटर, एक्सर्साइज पेडोमीटर, हार्ट रेट मॉनिटर, स्लीप मॉनिटर आणि टेम्प्रेचर मॉनिटरच्या सुविधेसह अनेक हेल्थ फीचर्स मिळतील. ही डिसेंबरमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. मात्र, याच्या किंमतीबाबत अधिकृत खुलासा झालेला नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CXkLmv

Comments

clue frame