Smartphone Discounts : मस्तच! १०० रुपयांपेक्षा कमीमध्ये खरेदी करा हे 4G Smartphones, 'असा' मिळवा डिस्काउंट
नवी दिल्ली : गेल्या काही काळात भारतात ऑनलाइन शॉपिंगचा ट्रेंड खूप वाढला आहे. देशातील प्रमुख ऑनलाइन शॉपिंग साइट्स त्यांच्या ग्राहकांसाठी वेळोवेळी उत्तम ऑफर्स घेऊन येत असतात, ज्यामुळे त्याची लोकप्रियता वाढत आहे. सध्या ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart चा ब्लॅक फ्रायडे सेल सुरू असून त्यात देखील अनेक जबरदस्त डील्स देण्यात येत आहेत. आज आम्ही अशा डीलबद्दल सांगणार आहोत ज्यामध्ये तुम्हाला १०० रुपयांपेक्षा कमी किमतीत 4G स्मार्टफोन मिळू शकतात. पाहा डिटेल्स. वाचा: : ४ GB RAM आणि ६४ GB ROM सह ११,९९० रुपयांचा हा Oppo स्मार्टफोन तुम्ही Flipkart वरून ९,९९० रुपयांना खरेदी करू शकता. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरल्यावर तुम्हाला ५०० रुपये परत मिळतील. एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास तुम्ही ९,४५० रुपये वाचवू शकाल. अशा प्रकारे, फोनची किंमत फक्त ४० रुपये असेल. : १०,९९९ रुपयांचा हा 4G स्मार्टफोन फ्लिपकार्टवरून ९,९९९ रुपयांना खरेदी करता येईल. या डीलमध्ये उपलब्ध प्रीपेड ऑफर अंतर्गत, जर तुम्ही या फोनसाठी ऑनलाइन पेमेंट केले तर तुम्हाला ५०० रुपयांची सूट मिळेल. एक्सचेंज ऑफरसह, तुम्ही ९,४५० रुपये वाचवू शकाल. अशा प्रकारे, फोनची किंमत फक्त ४९ रुपये असेल. Oppo A33 : Oppo A33 मध्ये ३२ GB इंटर्नल स्टोरेज आहे आणि तुम्ही १२,९९० रुपयांऐवजी १०,४९० रुपयांना खरेदी करू शकता. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरल्यावर तुम्हाला ५०० रुपये परत मिळतील. तुम्हाला एक्सचेंज ऑफरचा पूर्ण लाभ मिळाल्यास ९,९९० रुपये वाचवू शकाल. तुमच्यासाठी फोनची किंमत फक्त ६५ रुपये असेल. Infinix Hot 10S: तुम्ही हा फोन ६ GB रॅम सह १०,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. त्याची मूळ किंमत १३,९९९ रुपये आहे. Flipkart Axis Bank क्रेडिट कार्ड वापरल्यावर ५५० रुपये परत मिळतील. तुम्हाला एक्सचेंज ऑफरमधून १०,३५० रुपयांचा अतिरिक्त फायदा मिळू शकेल. म्हणजेच तुम्ही हा फोन फक्त ९९ रुपयांना खरेदी करू शकता. वाचा: वाचा: वाचा:
from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xye6Op
Comments
Post a Comment