Smartphone Blast : स्मार्टफोन आहे की बॉम्ब? आता 'या' नामांकित कंपनीच्या बजेट स्मार्टफोनमध्ये ब्लास्ट, पाहा कारण

नवी दिल्ली: स्मार्टफोन्सच्या ब्लास्टच्या घटना सुरूच असतात. काही काळापूर्वी Xiaomi Mi 11 Lite 4G स्मार्टफोनच्या स्फोटाची बातमी समोर आली होती आणि आता Poco ब्रँडचा बजेट स्मार्टफोन यात सामील झाला आहे . Poco स्मार्टफोनचा स्फोट होण्याची ही पहिलीच वेळ नाही. Poco M3 च्या आधी देखील चार्जिंग दरम्यान स्फोट झाल्याच्या बातम्या आल्या होत्या. वाचा: अलिकडेच एका ट्विटर युजर्सने जो पीडितेचा भाऊ आहे (@Mahesh08716488) ट्विट करून याबद्दल माहिती दिली आणि लिहिले की, My Brother Poco M3 मोबाईल स्फोट. या ट्विटमध्ये कोणत्या फोनचा स्फोट झाला याची माहिती देण्यात आली असून ट्विटसोबत Poco M3 चा एक फोटोही शेअर केला आहे, ज्यामध्ये फोन जळालेला दिसत आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे हे ट्विट नुकतेच पोस्ट केले गेले आहे आणि त्यात लिहिले आहे की, २७ नोव्हेंबर रोजी सकाळी झालेला ब्लास्ट. या घटनेची माहिती देताना पीडितेच्या भावाने पोको मोबाईलला आग लागल्याचे कारण स्पष्ट केले नसून, फोन शॉर्ट झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. ज्या यूजर्सचा फोन Blast त्यांचे काही नुकसान झाले आहे की नाही. याची माहिती सध्या तरी देण्यात आलेली नाही. Poco M3 मोबाईल ब्लास्ट नंतरचे चित्र भीतीदायक आहे ते युजर्स चित्रात पाहू शकतात. फोनचा मागील पॅनल पूर्णपणे जळाला आहे आणि फोन पाहिल्यावर हे स्पष्ट होते की फोन दुरुस्तीच्या स्थितीत नाही. कंपनीने स्पष्ट केले: पीडित युजरच्या भावाने हे प्रकरण Poco M3 Blast वर ट्विट केलेअसता अॅक्शन मोडमध्ये आलेल्या Poco India सपोर्ट टीमने देखील ट्विटला उत्तर देताना लिहिले की, महेश आम्हाला हे जाणून वाईट वाटत आहे की, तुम्हाला ची समस्या सतावते आहे. कंपनीने युजरला आश्वासन दिले आहे की या समस्येवर सर्वोत्तम उपाय दिला जाईल. अजूनही अनेक प्रश्नांची उत्तरे मिळणे बाकी : Poco M3 ब्लास्टला जबाबदार कोण, फोनचा मालक की कंपनी?, असे अनेक प्रश्न आता युजर्ससमोर उपस्थित झाले आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Latest Mobile Phones: Mobile News, Latest Mobile News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3xvCSPg

Comments

clue frame