SIM Card: तुमच्या आधार कार्डवर किती जणांनी घेतले सिम कार्ड? ‘या’ वेबसाइटद्वारे मिळेल संपूर्ण माहिती

नवी दिल्ली : घेण्यासाठी ओळखपत्र म्हणून द्यावे लागते. अनेकदा असे होते की, आपल्या आधार कार्डवर किती सिम कार्ड जारी करण्यात आले आहेत, याची माहितीच नसते. मात्र, आता दूरसंचार विभागाच्या एका वेबसाइटद्वारे तुम्ही तुमच्या आधार कार्डचा वापर करून किती सिम कार्ड घेतले गेले आहेत, याची माहिती घेऊ शकता. वाचा: सिम कार्डची माहिती मिळवण्यासोबतच, वेबसाइटद्वारे जे सिम वापरत नाही ते बंद करण्यासाठी देखील विनंती करता येईल. या सर्व्हिसला Telecom Analytics for Fraud Management and Consumer Protection (TAFCOP) नाव दिले आहे. ही सर्व्हिस सध्या देशातील ठराविक क्षेत्रासाठीच आहे. लवकरच संपूर्ण देशातील नागरिकांसाठी सुविधा उपलब्ध केली जाईल. अधिकृत वेबसाइटनुसार, सध्या ही सर्व्हिस आंध्र प्रदेश आणि तेलंगाना या राज्यात उपलब्ध करण्यात आली आहे. या सर्व्हिसचा वापर करणे खूपच सोपे आहे. तुम्हाला आधार कार्डवर जारी करण्यात आलेले सिम कार्ड्स तपासण्यासाठी सर्वात आधी https://ift.tt/3n3ox7n या वेबसाइटवर जावे लागेल. येथे तुम्हाला मोबाइल नंबर देऊन ओटीपीसाठी विनंती करावी लागेल. त्यानंतर तुमच्या नंबरवर ६ आकडी ओटीपी येईल. ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर आधार कार्डवर रजिस्टर्ड सर्व मोबाइल नंबर दिसतील. जर यातील एखादा नंबर तुमचा नसल्यास बंद करण्यासाठी तुम्हाला त्या नंबरच्या पुढे टिक मार्क करावी लागेल. त्यानंतर रिपोर्टवर क्लिक करा. जर सर्व नंबर योग्य असल्यास काहीही करण्याची गरज नाही. वाचा: वाचा: वाचा:


from Science & Technology News: Science News Updates, Science Technology News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3o4bULI

Comments

clue frame